Join us

किल्ले परंपरा राजस्थानची..

By admin | Updated: October 25, 2014 22:02 IST

दिवाऴीमध्ये किल्ले तयार करण्याची परंपरा फार वर्षापासूनची आहे. दिवाऴीमध्ये किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचा प्रारंभ सर्व प्रथम राजस्थान मध्ये झाला.

जयंत धुळप - अलिबाग
दिवाऴीमध्ये किल्ले तयार करण्याची परंपरा फार वर्षापासूनची आहे. दिवाऴीमध्ये किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचा प्रारंभ सर्व प्रथम राजस्थान मध्ये झाला. छत्नपती शिवाजी महाराजांचे पूर्वज राजस्थानचे असल्याने, कालांतराने ही स्फूर्तीदाई परंपरा महाराष्ट्रात आली आणि पक्की रु जली. शत्नूंच्या ताब्यातून जिंकलेले मुलुख प्रत्येकाला पाहणो शक्य नसल्याने राजस्थानातील राजे दिवाळीपूर्वी त्या मुलुखातल्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करीत असत. त्याकाळी राजस्थानातील जनतेकरीता या किल्ल्याच्या प्रतिकृती पाहण्यास जाणो म्हणजे मोठी उत्सुकतेची आणि दिवाळी साजरी करण्यातील मोठी बाब असे.
दिवाळीच्या शेवटच्या दिवशी राजांकडून फटाक्यांची आतषबाजी होत असे त्यावेऴी या किल्ल्याच्या प्रतिकृतींमध्ये फटाके लावून या प्रतिकृती उद्ध्वस्त केल्या जात असत. शत्रुचा हा मुलूख जिंकताना आपल्या सैन्याने दिलेला लढा राज्यातील प्रजेला कळावा असा उद्देश या मागे असायचा. राजस्थानात आजही हा प्रघात पाळला जातो . राजस्थानची ही परंपरा शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात रुजली. 
आजच्या बालकांच्या पिढीला टिव्ही, कॉम्प्यूटर, मोबाईल याच्या मायाजालातून थोडस बाजूला काढून छत्रपती शिवरायांचा अनन्यसाधारण इतिहास लक्षात आणून द्यावा, छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेला लढा त्यांच्यासमोर यावा आणि याच निमीत्ताने माती आणि इतिहासाशी त्यांचे नाते जोडले जावे, त्यांच्या बौद्धीक कुवतीच्या वृद्धीकरीता पुरातन स्थापत्यशास्त्नाची माहिती त्यांना व्हावी अशा महत्वपूर्ण हेतूने येथून जवळच असलेल्या कुरुळ गावांतील सु.ए.सो.शाळा व सृजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या कल्पकतेतून शाळेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून शाळेतल्या विद्याथ्र्याकरीता ‘दिवाऴी किल्ला स्पर्धा ’आयोजित करण्यात येते. 
 
शिक्षक-पालक सुसंवादाची 
कुरूळ शाळेची दिवाळी किल्ले स्पर्धा
4विद्याथ्र्यानी स्वत:च्या घराच्या अंगणातच किल्ला करायचा. दिवाळीतल्या एका दिवशी शाळेचे तिन-चार शिक्षक हे किल्ले बघायला मुलांच्या घरी जातात. मुलांनी त्यांच्या कल्पनेनी हवा तसा किल्ला बांधावा पण त्याबरोबर किमान एका किल्ल्याची माहिती, त्याचा इतिहास त्यांनी आपल्या किल्ल्याजवळ लिखित स्वरुपात मांडावा अशी अपेक्षा असते. शाळेतील ईतिहसाची पुस्तके, वाचनालय़ातील ईतिहसाची पुस्तके यांतून माहिती संकलीत करुन विद्यार्थी हा एका किल्ल्याचा ईतिहास आपल्या किल्ल्याजवळ मांडतात. 
4विद्याथ्र्याची या निमीत्ताने ईतिहासातील अभिरुची वाढते, इतिहास त्यांना आवडू लागतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे किल्ले परिक्षणाच्या निमीत्ताने शिक्षकांची मुलांच्या पालकांशी भेट होवून एक सुसंवाद होतो. पालकाना देखील खूप आनंद होतो. चहा, फराळाच्या आग्रहाला तोंड देताना शिक्षकांची तर अगदी दमछाक होते. मुल तर जाम खुष असतात. या सगळ्या किल्ल्यांचे फोटो काढून शाळेच्या स्नेहसन्मेलनात त्याचे छोटेसे प्रदर्शन देखील भरवण्यात येत असल्याचे मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले. किल्ले परंपरेतील एक कल्पक सकारात्म बदल या शाळेच्या या उपक्रमात पहावयास मिळतो.
 
1रायगड जिल्ह्यातील खापोलीमधील ‘वेध सह्याद्री’ या संस्थेच्या सागर बीरवाडकर,रोहन साखरे,आकाश घरडे, नीलेश मोकल या तरुणांनी एकत्र येऊन ‘शिवदुर्ग किल्ले प्रतिकृती स्पर्धा’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन दिवाळी फटाक्यांच्या प्रदूषणातून बालगोपाळांना बाहेर काढून छत्रपती शिवाजीराजांच्या गडकोटांच्या अभेद्यतेत घेऊन जाण्याकरिता यंदा केले आहे.
 
2दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा जपण्याच्या उद्देशाने या किल्ले प्रतिकृति स्पर्धेचे आयोजन केले आहे .लहान मुलांच्या कल्पकतेला वाव देणा:या आणि आपल्या इतिहासाबद्दल जागरु कता निर्माण करणा:या या उपक्र माला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे सागर बीरवाडकर यांनी सांगीतले.
 
3अधिकाधीक मुलांनी या किल्ले प्रतिकृती स्पर्धेत सहभागी व्हावे या करिता यंदा या स्पर्धेसाठी अनुक्र मे प्रथम क्र मांकास रु.2222, व सन्मानचिन्ह, द्वितीय क्र मांकास रु.1111 व सन्मानचिन्ह तर तृतीय क्र मांकास रु. 777 व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. यंदा तब्बल 8क् किल्लेदार विद्यार्थी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. मान्यवर परिक्षाच्या माध्यमातून किल्ल्याचे परिक्षण पूर्ण झाले असून, येत्या 2 नोव्हेंबर रोजी पारितोषिक वितरण होणार असल्याचे बारवाडकर यांनी सांगीतले.