Join us  

भुयारी मार्गासाठी वन विभागाला पालिकेची शंभर एकर जमिनीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 5:09 AM

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या जीएमएलआर प्रकल्पाअंतर्गत एसएनजीपीमधून ४.७ कि.मी. लांबीचे दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत.

मुंबई : राष्ट्रीय वन महामंडळाने गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याला हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य वन विभागाची परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेला वेग आला. मात्र वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसएनजीपी) भुयारी मार्गाच्या मोबदल्यात नुकसानभरपाई स्वरूपात ४८ एकरच्या दुप्पट जमीन देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे महापालिका शंभर एकर जमीन खरेदी करून त्या जागेवर वनक्षेत्र विकसित करणार आहे. यामुळे जीएमएलआर प्रकल्पालाही अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या जीएमएलआर प्रकल्पाअंतर्गत एसएनजीपीमधून ४.७ कि.मी. लांबीचे दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. अद्ययावत तंत्रज्ञाचा वापर करून या भूमिगत मार्गामुळे वन्यजीवांवर परिणाम होणार नाही, याची खात्री महापालिकेने दिली आहे. मात्र राज्याच्या वन विभागाने आक्षेप घेतल्यामुळे हा प्रकल्प अडचणीत आला होता. वन विभागाने नुकसानभरपाई म्हणून वनक्षेत्रासाठी जमीन देण्याची मागितली होती.मात्र महापालिकेने यापूर्वी नुकसानभरपाई देण्यास नकारदिला होता. परंतु, राज्याचा वनविभाग आपल्या मागणीवरअडून बसल्यामुळे अखेर महापालिकेने जमीन द्यायचे मान्य केले आहे.नॅशनल पार्क आथवा प्राणिसंग्रहालय जवळच एखादी मोकळी जागाघेऊन वन क्षेत्र विकसितकरण्याचा नियम राज्याच्या विभागाने २०१४-१५ मध्ये केला होता. वन विभागाच्या सूचनेनुसार ताडोबा येथील जागा घेण्यात येणार आहे, असे पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले.जागा ताब्यात घेण्यासाठी मसुदा!- महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात चंद्रपूरला जाऊन त्या जागेची पाहणी केली. तसेच त्या जागेबाबत कोणताही वाद नसल्याची खात्री करून घेतली. त्यानंतरच ही जागा ताब्यात घेण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे.- ताडोबानजीकच असलेल्या पळसगाव या गावातील जमीन बघून ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी वन क्षेत्र तयार झाल्यानंतर वाघ आणि अन्य प्राण्यांना आणखी वन क्षेत्र उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :मुंबई