Join us  

मुंबई विमानतळावरून ७१ लाखांचे विदेशी चलन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 6:04 AM

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ७१ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन गुरुवारी रात्री जप्त करण्यात आले.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ७१ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन गुरुवारी रात्री जप्त करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)च्या जवानांकडून प्रवाशांची तपासणी सुरू असताना एका प्रवाशाची वागणूक संशयास्पद वाटल्याने त्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. या बॅगेमध्ये ९९ हजार ५५० अमेरिकन डॉलर्स आढळले. या डॉलर्सची भारतीय चलनातील किंमत ७१ लाख रुपये आहे. सीआयएसएफचे साहाय्यक उपनिरीक्षक करतार सिंह यांना प्रवाशाच्या बॅगेमध्ये संशयास्पद प्रतिमा दिसल्यानंतर त्यांनी सखोल तपासणी केली.अतिव परेश मेहता हा भारतीय प्रवासी कॅथे पॅसेफिक एअरलाइन्सने हाँगकाँगला जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. एवढी मोठी रक्कम सोबत घेऊन जाण्याचे समाधानकारक उत्तर त्याला देता आले नाही. सीआयएसएफ व सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर ७१ लाख रुपये किमतीच्या ९९ हजार ५५० अमेरिक न डॉलर्ससहित आरोपी अतिव मेहताला सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात सोपवण्यात आले.याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती सीआयएसएफचे साहाय्यक महानिरीक्षक हेमेंद्र सिंह यांनी दिली.