Foreign currency seized at airport | विमानतळावर ९ लाखांचे विदेशी चलन जप्त
विमानतळावर ९ लाखांचे विदेशी चलन जप्त

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ९ लाख १६ हजार रुपये किमतीचे विदेशी चलन नुकतेच जप्त करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांकडून प्रवाशांची तपासणी सुरू असताना एका प्रवाशाची वागणूक संशयास्पद वाटल्याने त्या प्रवाशाच्या बॅगेची सखोल तपासणी करण्यात आली. या बॅगेमध्ये १० हजार अमेरिकन डॉलर्स आढळले. याशिवाय १ लाख १३ हजार ६१० थाई चलन, ८५७ यूआन व ५० हजार रुपये भारतीय रुपये असा एकूण सव्वा नऊ लाख १६ हजार ६४४ रुपयांचे चलन जप्त करण्यात आले. या प्रकरणी तुर्कीश एअरलाइन्सने बँकॉकला जाण्याच्या तयारीत असलेल्या मोेहम्मद फारुक या आॅस्ट्रेलियन नागरिकाला अटक करण्यात आली. विदेशी चलन व आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Web Title: Foreign currency seized at airport
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.