मुंबई : वांद्य्रातील पाच मजली इमारत कोसळली, अडकलेल्या लोकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 06:32 PM2022-01-26T18:32:04+5:302022-01-26T18:32:21+5:30

Mumbai Building Collapse : अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात यश.

five storey building collapse in Behram Nagar locality of Bandra East Mumbai | मुंबई : वांद्य्रातील पाच मजली इमारत कोसळली, अडकलेल्या लोकांची सुटका

मुंबई : वांद्य्रातील पाच मजली इमारत कोसळली, अडकलेल्या लोकांची सुटका

Next

Mumbai Building Collapse : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये काही लोक अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. यामध्ये पाच जण अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. परंतु आता यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ६ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही घटना बेहराम नगर भागात घडल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं. एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी मुंबईतील मालाड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली होती. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.


काही दिवसांपूर्वी मुंबईतील ताडदेव परिसरातील कमला बिल्डिंग या बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर २३ जण जखमी झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात आलं होतं. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने चौकशीसाठी एक समिती स्थापन केली.

Web Title: five storey building collapse in Behram Nagar locality of Bandra East Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.