Join us  

‘मनोरा’ पाडून पाच महिने उलटले, तरी अजून बांधकामाचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 2:48 AM

दोन टॉवरचे नियोजन; पण आतापर्यंत ना तरतूद ना प्रशासकीय मान्यता

मुंबई : मनोरा आमदार निवास पाडून त्या ठिकाणी ३४ मजल्यांचे दोन टॉवर उभारण्यासाठी भूमिपूजन होऊन तीन महिने उलटले पण अजून एकही विट रचली गेलेली नाही. या कामासाठी ना आर्थिक तरतूद झाली आहे आणि ना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.जुलै २०१९ मध्ये मनोरा आमदार निवास पाडण्यात आले होते. २४ जुलै रोजी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ८०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे कंत्राट नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला (एनबीसीसी) देण्यात आले आहे. धक्कादायक माहिती अशी आहे की या कामाला अद्याप प्रशासकीय मान्यताच शासनाने दिलेली नाही. शिवाय, आवश्यक ती आर्थिक तरतूददेखील केलेली नाही. त्यासाठीच्या मान्यतेचा प्रस्ताव विधानमंडळ कार्यालयाने पूर्वीच शासनाला सादर केला आहे.आमदारांचा कल भाड्याने खोलीऐवजी हॉटेलकडेज्या आमदारांकडे विस्तारित वा आकाशवाणी आमदार निवासात एकही खोली नाही त्यांना बाहेर भाड्याने खोली घेण्यासाठी एक लाख रुपये महिन्याकाठी दिले जात आहेत. मात्र, बहुतांश आमदार खोली भाड्याने घेण्याऐवजी हॉटेलात खोली घेऊन राहतात. मुंबईत वर्षातून साधारणत: सव्वाशे ते दीडशे दिवस यावे लागते. अशावेळी खोली भाड्याने घेण्याऐवजी हॉटेल मुक्कामाचे पॅकेज ठरवून तेथे राहण्याकडे आमदारांचा कल दिसतो.मएमआरडीएचीही अद्याप परवानगी नाहीएमएमआरडीएने मनोऱ्याच्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी खोदकाम करण्यासंदर्भात परवानगी दिली होती. त्यामुळे त्या आधारे भूमिपूजनाचा समारंभ उरकण्यात आला.मात्र, नवीन इमारत उभारण्याची परवानगी एमएमआरडीएने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे बांधकाम सुरू करण्यात ती देखील मोठी अडचण आहे.