मुंबईत आज पाच लाख कोविड लस येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:23 AM2021-01-13T05:23:18+5:302021-01-13T05:23:40+5:30

कांजूरमार्ग कोल्ड स्टोअरेजचे काम अपूर्ण : परळच्या सेंटरमध्ये साठवणूक

Five lakh Kovid vaccines will be available in Mumbai today | मुंबईत आज पाच लाख कोविड लस येणार

मुंबईत आज पाच लाख कोविड लस येणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू होणार असल्याने बुधवारी पाच लाख कोरोना लसी आणण्यात येणार आहेत. मात्र कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोअरेजचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही; त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून परळ विभाग कार्यालयातील स्टोअरेज सेंटरमध्ये त्या ठेवण्यात येतील.

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन गेल्या आठवड्यात मुंबईतील तीन रुग्णालयांमध्ये पार पडला. आतापर्यंत ७५० मास्टर ट्रेनर आणि अडीच हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले. येत्या शनिवार (दि. १६) पासून लसीकरणाला सुरुवात केली जाईल. यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पाच लाख लसी आज, बुधवारी मुंबईत आणण्यात येणार आहे. मात्र कांजूरमार्ग येथे तयार केलेले ऑल स्टोरीज सेंटर अद्याप यासाठी तयार नाही. त्यामुळे परळ येथे लस साठवण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या ठिकाणी दहा लाख डोस साठवता येतील, अशी व्यवस्था आहे.

दोन लाख लोकांची कोविन अ‍ॅपवर नोंदणी
मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रन्टलाइन वर्कर अशा दोन लाख लोकांची नावे कोविन अ‍ॅपवर नोंदवण्यात आली आहेत.

n केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदी रुग्णालयांत तसेच वांद्रे कुर्ला संकुलमधील कोविड केअर सेंटरमध्येही लसीकरण केले जाईल.

n पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. तसेच आगामी काळात काही महिन्यांत शाळा, विभागातील सभागृहांमध्ये लसीकरण केले जाणार आहे.
n कामाठीपुऱ्यात रहिवाशांसह, महिलांना कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी गौराबाई दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे.

Web Title: Five lakh Kovid vaccines will be available in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.