Join us  

वरळी कोळीवाड्यातील कोस्टल रोडचे काम मच्छिमारांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 9:53 PM

उद्या जर दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी कुठल्याही विभागाने स्वीकारली नसल्याच्या आरोप मच्छिमारांनी केला आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाकांक्षी असलेला ड्रीम प्रोजेक्ट मुंबई कोस्टल रोडच्या बांधकामाबाबत वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमार हे कमालीचे नाराज आहेत. येथील मच्छिमारांच्या एकही मागणी मान्य न करता मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे.

कोस्टल रोड प्राधिकरणाच्या मनमानी काराभारामुळे इथल्या स्थानिक मच्छिमारांनी दि, ३० ऑक्टोबर रोजी कोस्टल रोडचे काम बंद पाडत आंदोलन केले होते.येथील समुद्रात येथील मच्छिमारांनी मासेमारी बंद करून  आपल्या बोटी नेवून दिवस-रात्र ते या बोटीवर राहत होते आणि कंत्राटदाराच्या बोटीनां अटकाव करुन काम बंद पाडत होते.

कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वरळी कोळवाडा नाखवा मत्स्यव्यवसाय सहकारी सोसायटी लिमिटेड चे सेक्रेटरी नितेश पाटील आणि अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पाटील यांनी लोकमतला ही माहिती दिली.

येथील मच्छिमारांनी आता पर्यंत समतोल भूमिका घेतली होती परंतू आता प्राधिकरणाच्या अश्या हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजावर आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी मच्छिमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे.आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या बरोबरच बैठक हवी आहे अशी ठाम भूमिका येथील मच्छिमारांनी घेतली आहे. मासेमारीसाठी जाण्यासाठी समुद्रातील  मार्गात असलेल्या दोन पिलर च्या मधील अंतर २०० मीटर ठेवण्याची असून प्राधिकारण त्याचे अंतर ६० मीटर ठेवले आहे. उद्या जर दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी कुठल्याही विभागाने स्वीकारली नसल्याच्या आरोप मच्छिमारांनी केला आहे.

दात्म्यान याबाबत मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दि,11 रोजी  वरळी कोळीवाड्याला भेट देऊन येथील कोळीबाधवांच्या समस्येवर तोडगा काढू. वरळीतल्या कोळी बांधवांच त्यावर काय म्हणणं आहे ते आज मी ऐकून घेतले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहे, लवकरच त्यावर तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिले होते. महापालिकेलाही सांगितल आहे की, जो पर्यंत आमच्या मिटिंग मध्ये निर्णय होत नाही, तो पर्यंत पुढचे काम करू नका, बाकी काम सुरू ठेवा. त्यामुळे येथील मच्छिमारांनी पुन्हा आपल्या बोटी सुमद्रात नेऊन मासेमारी पुन्हा सुरू केली,मात्र आज दुपारी अचानक कंत्राटदाराने आपल्या बोटी आणून पुन्हा काम सुरू केल्याने येथील मच्छिमार आक्रमक झाले,आणि त्यांनी काम बंद पाडले अशी माहिती येथील मच्छिमारांनी दिली. दरम्यान कंत्राटदार आज रात्री पोलिस संरक्षणत बोटी आणून पुम्हा काम सुरू करणार असून.उद्या पासून पालिकेने परत काम सुरू करा असे आदेश पालिका प्रशासनाने कंत्राटदार दिल्याची माहिती येथील मच्छिमारांनी दिली.