Join us  

कल्याण, बदलापूर, टिटवाळा स्थानकात पादचारी पूल, एस्कलेटर्सना मंजूरी :खासदार कपिल पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 2:38 PM

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेवरील कल्याण, बदलापूर, टिटवाळा, वांगणी येथे नव्या पादचारी पूलाला मंजुरी मिळाली असून, कल्याण, बदलापूर आणि टिटवाळ्यात स्वयंचलित जिने (एस्कलेटर्स) बसविण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देप्रवाशांची वाढती संख्या कल्याण, बदलापूर, टिटवाळा, वांगणी येथे पादचारी पूल

डोंबिवली: प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेवरील कल्याण, बदलापूर, टिटवाळा, वांगणी येथे नव्या पादचारी पूलाला मंजुरी मिळाली असून, कल्याण, बदलापूर आणि टिटवाळ्यात स्वयंचलित जिने (एस्कलेटर्स) बसविण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापकांसमवेत पाटील यांची नुकतीच बैठक झाली. एल्फिन्स्टन रोड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकाबरोबरच बदलापूर, टिटवाळा येथील प्रवाशांच्या वाढत्या संख्येकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी हा निर्णय जाहीर केला. कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वांगणी येथे नवे पादचारी पूल उभारण्याबरोबरच कल्याण, बदलापूर आणि टिटवाळा येथे एस्कलेटर्स बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी मंजुरी मिळालेल्या बदलापूर येथे होम प्लॅटफॉर्मचे काम वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी बदलापूर, कसारा आणि खडवली येथील पादचारी पूलाचे काम लवकारत लवकर पूर्ण करण्याच्या सुचनाही रेल्वे अधिका-यांनी दिला. टिटवाळा येथील तिकीट खिडकीची वेळ सकाळी आठपासून रात्री नऊपर्यंत करावी, भिवंडी रेल्वे स्थानकात मेल-एक्सप्रेस गाड्यांना दोन मिनिटांचा थांबा द्यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन मध्य रेल्वे प्रशासनाने दिले.मध्य रेल्वे प्रशासनाने एक आॅक्टोबरपासून लागू केलेल्या वेळापत्रकात कसारा रेल्वे स्थानकात पुष्पक एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस, पाटलीपूत्र एक्सप्रेस, गोदान एक्सप्रेस आदींसह काही गाड्यांना थांबा होता. त्यातून मुंबई व नाशिककडे जाणा-या हजारो नोकरदार व व्यावसायिकांची सोय होत होती. मात्र, अचानक रेल्वेने थांबे रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या गाड्यांना पूर्ववत थांबे द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी केली. 

 

टॅग्स :मुंबईठाणे