Join us  

परळ टर्मिनसवरून रविवारी धावणार पहिली लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 2:17 AM

परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांची लोकल चालविण्यात येणार आहे.

मुंबई : एल्फिस्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासन जागे होऊन परळ स्थानकावर अनेक पायाभूत सुविधा सुरू केल्या. यासह दादर स्थानकातील गर्दी कमी करण्याचे उद्देशाने परळ स्थानकाचे रूपांतर परळ ‘टर्मिनस’ मध्ये केले आहे. ३ मार्च रोजी परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे लोकल धावणार आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात येणार आहे.

परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांची लोकल चालविण्यात येणार आहे. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. कल्याण दिशेकडे १६ फेऱ्या आणि परळ दिशेकडे १६ फेऱ्या अशा एकूण ३२ फेºया चालविण्यात येणार आहेत. कल्याणहून परळ टर्मिनसकडे सकाळी ७ वाजून ९ मिनिटांना रवाना होणार आहे. तर शेवटची लोकल कल्याणहून ९ वाजून ५२ मिनिटांला परळ टर्मिनसकडे रवाना होणार आहे.

परळ टर्मिनससह कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, सायन, दिवा येथील पादचारी पुलांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ स्टेशनची सुधारणेचे आणि सरकता जिन्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासह पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेसचे उद्घाटन केले.परळ परिसरात कॉर्पोरेट कंपनी आणि इतर अनेक कंपन्या असल्याने कामगार प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे परळ टर्मिनसचा फायदा कामगारवर्गाला होणार आहे. दादर येथील गर्दीचे विभाजन परळ टर्मिनसमुळे होणार आहे. परळ टर्मिनस पश्चिम रेल्वे मार्गाला जोडत असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करणे सोयीचे जाणार आहे. प्रशस्ती तीन पादचारी पूल तयार झाल्याने गर्दीचे विकेंद्रीकरण होणे शक्य होणार आहे.