Join us  

‘आधी निकाल जाहीर करा, मगच पुनर्परीक्षा घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 6:12 AM

हजारो विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असतानाच, येत्या काही दिवसांनी पुन्हा विधि विभागाची पुनर्परीक्षा (एटीकेटी) होणार आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे धाव घेतली.

मुंबई : हजारो विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असतानाच, येत्या काही दिवसांनी पुन्हा विधि विभागाची पुनर्परीक्षा (एटीकेटी) होणार आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे धाव घेतली. आधी निकाल जाहीर करा, मगच पुनर्परीक्षा घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.२५ व २६ जूनपासून होणाऱ्या पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे पैसे आणि वेळ फुकट जाणार आहे. शिवाय त्यांना मनस्ताप होईल. त्यामुळे आधी सेमिस्टर १, ३ आणि ५ च्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांसह स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली. त्यातच विद्यार्थ्यांनी केली आहे.