पनवेल : खांदा वसाहत येथे असलेल्या इमारतीच्या कॉम्प्लेक्समधील नवव्या मजल्यावर अचानकपणे लागलेल्या आगीत सदर ब्लॉकचे मोठे नुकसान झाले आहे. खांदा वसाहत येथील सेक्टर-१ या ठिकाणी असलेल्या तुलसी टॉवर या सोसायटीच्या नवव्या मजल्यावरील ब्लॉकमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. सदर ब्लॉकच्या बेडरुममध्ये ही आग पसरुन या आगीत बेडरुममधील इतर साहित्य तसेच कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचून त्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे. या आगीसंदर्भातील माहिती आ. प्रशांत ठाकूर यांना मिळताच त्यांनीसुध्दा घटनास्थळी धाव घेऊन आगीची माहिती घेतली. दरम्यान सदर आग कशामुळे लागली याचा शोध खांदेश्वर पोलीस घेत आहेत. (वार्ताहर)
खांदा वसाहतीतील तुलसी टॉवरमध्ये आग
By admin | Updated: May 31, 2014 02:16 IST