Join us

मुलुंड येथे मिनी स्टोअरमध्ये आग

By admin | Updated: May 3, 2014 14:56 IST

मुलुंड (पूर्व) हनुमान चौक येथे एका मिनी स्टोअरमध्ये किरकोळ आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : मुलुंड (पूर्व) हनुमान चौक येथे एका मिनी स्टोअरमध्ये किरकोळ आग लागल्याची घटना घडली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या स्टोअरमध्ये असलेल्या एसीने शॉर्टसर्कीटमुळे पेट घेतल्याने ही आग लागली. यावेळी झालेल्या धुरामुळे कर्मचारी आणि ग्राहकांचीही पळापळ सुरु झाली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी घेईपर्यंत रहिवाशी आणि कर्मचार्‍यांनी आग विझवली.