Fire incidents at Chembur, Kurkumbh MIDC; Loss of crores | चेंबूर, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना; करोडोंचे नुकसान

चेंबूर, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना; करोडोंचे नुकसान

मुंबई/पुणे : आज पहाटेच्या सुमारास मुंबई आणि पुण्यामध्ये आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसली तरीही करोडोंचे नुकसान झाले आहे. 


पहिल्या घटनेत चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेरील बाजारपेठेला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये काही दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशामक दलाचे 10 बंब घटनास्थळी आले होते. सकाळी उशिराने ही आग विझविण्यात आली. 
दुसऱ्या घटनेमध्ये पुण्याजवळील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. यामध्ये ही कंपनी जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीतही अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीचे आणि धुराचे लोळ आगीची दाहकता दाखवत होते. वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fire incidents at Chembur, Kurkumbh MIDC; Loss of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.