Join us  

अखेर आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची झाली बदली

By मनोहर कुंभेजकर | Published: February 04, 2024 6:11 PM

मनोहर कुंभेजकर/ मुंबई- महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या दि,31 जानेवारीच्या आदेशानुसार आरे येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे ...

मनोहर कुंभेजकर/ मुंबई- महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या दि,31 जानेवारीच्या आदेशानुसार आरे येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांची बदली आता मुद्रांक जिल्हाधिकारी ( अंमलबजावणी ) या पदावर करण्यात आली आहे.शासनाचे उपसचिव संतोष गावडे यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने सदर बदलीचे आदेश काढले आहेत.

आपल्या कार्यकालात बाळासाहेब वाकचौरे यांनी आरेच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या नावाखाली गेली 100 वर्षे सुरू असलेल्या आरे तलावातील गणेश विसर्जनाला त्यांनी घातलेली बंदी आणि आरेच्या विकासकामांना त्यांनी लगाम घातला होता.यामुळे त्यांच्यावर आरेची जनता व लोकप्रतिनिधी नाराज होते.त्यांच्या विरोधात आरेवासीयांनी केलेल्या तक्रारींची दखल अखेर शासनाने घेतली आणि त्यांची येथून बदली केली अशी प्रतिक्रिया नवक्षितीज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी व्यक्त केली.

आरे मधील अंतर्गत रस्ते दुरुस्त करा,आरे युनिट क्रमांक 16 मधील आरे हॉस्पिटल ठेकेदाराला न देता आपला दवाखाना म्हणून घोषित करा, आरे मधील नागरिकांना लाईट मीटर व घर दुरुस्तीला परवानगी द्या,आरेतील पडायला आलेली सरकारी निवासस्थाने व शौचालये तात्काळ दुरुस्त करा,आरेतील सर्व धार्मिक स्थळांना लाईट मीटर व दुरुस्तीसाठी परवानगी द्या विविध मागण्यांसाठी आरे प्रशासना विरोधात दि,14 जानेवारीला आरेच्या जनतेने उस्फूर्तपणे "भीक मागो आंदोलन" छेडले होते अशी माहिती प्रभाग क्रमांक 52चे उद्धव बाळासाहेब गटाचे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी दिले. आरेच्या नागरिकांच्या एकीचा हा विजय असून अखेर शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेत बाळासाहेब वाकचौरे यांची बदली केल्याबद्धल गाढवे यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :आरेबदली