Join us  

भराव टाकून कफ परेडमध्ये भव्य उद्यान, पालिका चार कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 2:57 AM

समुद्रात भराव टाकून उभारण्यात येणाऱ्या कफ परेड येथील महत्त्वाकांक्षी सेंट्रल पार्कसाठी विकास आराखड्यातच आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुंबई : समुद्रात भराव टाकून उभारण्यात येणाऱ्या कफ परेड येथील महत्त्वाकांक्षी सेंट्रल पार्कसाठी विकास आराखड्यातच आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कंपनीमार्फत येथे जलमार्ग, सुशोभित रस्ते आणि जेट्टीसह अत्याधुनिक सुविधा असणारे भव्य उद्यान उभारण्यासाठी कृती आराखडाच तयार करण्यात येणार आहे.न्यू यॉर्क शहरातील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर कफ परेड येथे समुद्रात भराव टाकून उद्यान साकार होणार आहे. समुद्रात भराव टाकण्यासाठी मुंबई मेट्रोकरिता खोदण्यात येणाºया भुयारांमधून निघणाºया मातीसह इतर प्रकल्पांमधून येणारी माती व मुरुम यासाठी वापरली जाणार आहे. याबाबत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी) व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने तयार केलेल्या मूल्यमापन अहवालाचा अभ्यास करून अंमलबजावणी करणे आणि निविदेचा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे.महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता. त्यामुळे विकास आराखड्यात विशेष आरक्षण ठेवून या प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्यात आला. या कामासाठी ‘मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लि.’ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. या सल्ल्याच्या मोबदल्यात या कंपनीला ३ कोटी ८७ लाख रुपये मिळणार आहेत.असे असेल सल्लागाराचे कामउद्यानासाठी नेमण्यात येणाºया सल्लागाराला विस्तृत प्रकल्प अहवाल व प्रकल्पाचा वास्तविकता अहवाल सादर करावा लागणार आहे. याशिवाय संबंधित संस्थेला निविदेचा मसुदाही तयार करावा लागेल. या कामासाठी लागणाºया विविध परवानग्या, परवाने मिळविण्यासाठी मदत करणे, प्रकल्पाच्या विकासासाठी पर्याय सुचविणे आणि थ्रीडी इमेज तयार करणे अशी कामे करावी लागणार आहेत. प्रकल्पाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारीही सल्लागाराची असणार आहे.वाहतुकीचे नियोजनही जागा विकसित झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ निर्माण होणार आहे. त्यामुळे या जागेवरील वाहतूक व्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापनासह महत्त्वपूर्ण असणाºया सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत सल्लागाराला अभ्यास करून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असलेला अहवाल सादर करावा लागेल. याशिवाय ई-निविदा, वास्तुशास्त्रीय आराखडे, देयकांबाबतही नियोजन सल्लागाराला सुचवावे लागेल.

टॅग्स :मुंबई