चिरनेर : देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी म्हणून आपल्या पिकत्या जमीनी क वडीमोल भावाने दिलेल्या प्रकल्पग्रस्तांचे गेल्या २४ वर्षात योग्य पुनवर्सनच झाले नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा पुनर्वसन अधिकार्यांनी मागील २४ वर्षे आापली फसवणूक केली आहे. या निकषाखाली आजपासूनच उरण तालुक्यातील हजारो प्रकल्पग्रस्त रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे अनोखे आंदोलन करणार आहेत. जिल्हाधिकार्यांचीच प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेय किंवा नाही हे पाहण्याची मुख्य जबाबदारी होती. उरण तालुक्यात गेल्या वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे हक्क मागणीसाठी लढे होताना दिसत आहे. या ठिकाणच्या प्रकल्पांमधील नोकरभरतीसह, प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन, त्यांना देणे गरजेचे होते असे प्रशिक्षण, साडेबारा टक्केचे भूखंड, गरजेपोटी बांधल्या गेलेल्या घरांच्या नियमिततेचा प्रश्न, मागील साठ वर्षात एकदा ही न झालेली गावठाण विस्तार योजना आदि कारणांमुळे देशाच्या विकासासाठी म्हणून कवडीमोल भावाने जमीनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना नैराश्येने ग्रासले आहे.उरणमधीलच सर्वाधिक प्रकल्पग्रस्त साडेबारा टक्के भूखंडाच्या लाभापासून वंचित आहेत. सिडकोच्या माध्यमातून संपादित केलेल्या येथील जमीनीवर लाखोंचा रोजगार निर्माण करणारे प्रकल्प उभे राहिले म्गावागावातील आजही लाखो तरुण रोजगारापासून वंचित आहेत. त्यामुळेच प्रकल्प आमच्या उशाला पन नोकर्यांबाबतची कोरड पडलीय घशाला, असे म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. (वार्ताहर)
फसवणुकीविरोधात प्रकल्पग्रस्त करणार फौजदारी गुन्हे दाखल
By admin | Updated: May 30, 2014 00:36 IST