Join us

कोरोना होऊनही बाहेर फिरणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असतानाही होम क्वारंटाइन राहण्याऐवजी बाहेर फिरणाऱ्या चेंबूरमधील ५२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असतानाही होम क्वारंटाइन राहण्याऐवजी बाहेर फिरणाऱ्या चेंबूरमधील ५२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ फेब्रुवारी रोजी चेंबूरच्या सायन-पनवेल मार्गालगत असणाऱ्या एका सोसायटीमधील २० वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे महापालिकेने त्या मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला होता. दोन दिवसांनंतर त्या मुलीच्या आई-वडिलांनादेखील कोरोनाची लागण झाली. या कुटुंबातील सदस्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला असतानादेखील २७ फेब्रुवारी रोजी मुलीचे वडील चेंबूर जिमखाना क्लब येथे गेले. याबाबत हे कुटुंब राहत असलेल्या सोसायटीच्या सेक्रेटरीने पालिकेच्या एम पश्चिम विभागात माहिती कळविली. याबाबत माहिती मिळताच पालिकेचे आरोग्य कर्मचारी त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरी गेले. तेव्हा हा प्रकार समोर आला.