Join us

अर्णब गोस्वामींविरुद्ध देशद्राेहाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:35 IST

एमएचबी पोलिसांना काँग्रेसचे पत्रलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी ...

एमएचबी पोलिसांना काँग्रेसचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहोचली, असा सवाल करत बुधवारी मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये गोस्वामींविराेधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठीचे पत्र दिले.

अर्णब गाेस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटची लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतही चर्चा झाल्याचे समोर आले. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पावले न उचलल्याचा आराेप करत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर विधानसभा क्षेत्रात एमएचबी पोलीस ठाण्यात मुंबई काँग्रेस सचिव धनंजय जुन्नरकर, तिलोत्तमा वैद्य, लौकिक सुत्राळे, विनोद शर्मा, नित्यानंद शेट्टी यांनी तक्रार अर्ज दाखल केला. यावेळी इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर असल्याने पोलीस जनसंपर्क अधिकारी प्रकाश जाधव यांनी तक्रार अर्ज स्वीकारला.

------- --------------------