भिवंडी : शहरातील नवभारत इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या व्यवस्थापन समितीने शासन निर्देशापेक्षा जास्त फी आकारणी केल्याने शाळेसमोर पालक संघटना व मनसेच्या विद्यार्थी सेनेमार्फत आंदोलन छेडण्यात आलेशहरात ब्राह्मणआळीतील नवभारत एज्युकेशन सोसायटीच्या एन.ई.एस. इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संचालकांनी व व्यवस्थापन समितीने २०१५-१६ च्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्तेनुसार ५२ ते ६४ टक्के फीवाढ केली. तर ज्युनियर के.जी. प्रवेशासाठी २५ ते ३० हजार रुपये देणगी घेतली जात असल्याचा आरोप करून पालकांनी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. फीवाढीसाठी शासनाच्या शालेय शुल्क निर्धारण समितीची परवानगी न घेता शालेय व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून १५ जुलै २०१५ रोजी होणाऱ्या निर्णयानुसार ती लागू होईल, असा फलक शाळेसमोर लावून पालकांना घरचा रस्ता दाखविला. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेसमोर निदर्शने केली. (प्रतिनिधी)
फीविरोधात भिवंडीत पालकांचे आंदोलन
By admin | Published: July 07, 2015 12:55 AM