Join us  

सर्वच पक्षांची आमदारकीसाठी फिल्डिंग! नव्या समीकरणांमुळे चुरस वाढली

By अतुल कुलकर्णी | Published: February 25, 2018 3:30 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या सहा आमदारांची मुदत जूनपर्यंत संपत आहे. या जागांसाठी सर्वच पक्षांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. नव्या समीकरणांमुळे चुरस वाढली आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या सहा आमदारांची मुदत जूनपर्यंत संपत आहे. या जागांसाठी सर्वच पक्षांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. नव्या समीकरणांमुळे चुरस वाढली आहे.पाच जागांसाठी २१ जून २०१८ रोजी तर एकाची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. राष्टÑवादीचे दोन जागांवर नुकसान होईल, असे दिसत आहे. मात्र भाजपा शिवसेनेत लढत लावून द्यायची व मतविभागणीत आपले उमेदवार निवडून आणण्याची रणनिती काँग्रेस, राष्टÑवादीने एकत्रित आखणे सुरू केले आहे. सहा आमदार निवडून आले तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय बलाबल त्यांना पुरक होते. मात्र तीन वर्षांतील निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेने अनेक मतदारसंघात आघाडी घेतल्यामुळे आता काँग्रेस व राष्टÑवादीला एक-एक जागेवर पाणी सोडावे लागणार आहे.लातूर, बीड, उस्मानाबादमधून काँग्रेसचे दिलीपराव देशमुख निवडून आले होते. पण आता येथे भाजपासोबतच राष्टÑवादीनेही मुसंडी मारली आहे. येथे भाजपाची २४७ व शिवसेनेची ५१ अशी एकूण २९८ तर काँग्रेसची १४१ व राष्टÑवादीची २५१ अशी ३९२ मते आहेत. मात्र अधिक मते असल्याने येथे आता राष्टÑवादीने दावा केला आहे. दिलीपराव देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू. त्यामुळे ती जागा मिळाली तर राष्टÑवादीला हवेच आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसचे परिषदेतील संख्याबळ एकाने कमी होणार आहे.परभणी, हिंगोलीतून राष्टÑवादीचे बाबा जानी दुर्राणी निवडून आले होते. येथे राष्टÑवादीची १५९ व काँग्रेसची १३१ अशी एकूण २९० मते आहेत. त्या उलट भाजपाची ५१ व शिवसेनेची ९९ अशी एकूण १५० मते आहेत. त्यामुळे ही जागा कायम राखण्यात राष्टÑवादीला यश येईल. पण राष्टÑवादी बाबा जानी यांनाच तिकीट देणार की दुसरा चेहरा शोधणार याचीही चर्चा दोन्ही पक्षाच्या बैठकीत झाल्याचे समजते.नाशिकहून राष्टÑवादीचेच जयंत जाधव निवडून गेले होते. मात्र त्यांना आता ही निवडणूक अवघड झाली आहे. येथे सगळ्यात जास्त म्हणजे शिवसेनेकडे १८८ त्यानंतर १५५ मते भाजपाकडे आहेत. दोघांची एकत्रित मते ३४३ आहेत तर राष्टÑवादीकडे ८९ व काँग्रेसकडे ७३ अशी फक्त १६२ मते आहेत. ही जागा शिवसेनेने मागितली आहे. जर रायगडला शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिला तर नाशिकला भाजपा स्वतंत्र उमेदवार देणार का, यावर येथील निकाल अवलंबून असेल.अमरावतीमधून भाजपाचे विद्यमान राज्यमंत्री प्रवीण पोटे विजयी झाले होते. तेथे आजही भाजपाकडे सगळ्यात जास्त १९५ तर शिवसेनेकडे ३० मते आहेत. भाजपा सेनेची एकूण मते २२५ होतात. तर काँग्रेसकडे १३६ व राष्टÑवादीकडे ३७ अशी १७३ मते आहेत. त्यामुळे येथे भाजपा एकतर्फीसुद्धा विजयी होईल.वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधून भाजपाचे मितेश भांगडिया निवडून आले होते. तेथे आता भाजपाकडे तब्बल ४८३ तर शिवसेनेकडे ४५ मते आहेत. दोघांची मिळून ५२८ मते असल्याने ही निवडणूक भाजपा एकतर्फी जिंकू शकते. पण भाजपाने येथे नवीन उमेदवार द्यावा, अशी चर्चा पक्षात चालू असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. येथे काँग्रेसची २४९ व राष्टÑवादीची ७१ अशी एकूण ३२० मते आहेत.फायदा मतदारांनारायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गमधून निवडून आलेले राष्टÑवादीचे अनिल तटकरे यांची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. मात्र आता येथे शिवसेनेकडे २४७ मते आहेत. तर भाजपाकडे १३५. दोघांची मिळून ३८२ मते आहेत. तर राष्टÑवादीकडे १५५ आणि काँग्रेसकडे १३३ अशी एकूण २८८ मते आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेने स्वतंत्र लढावे असे प्रयत्न चालू झाले आहेत. मतांच्या मारामारीत राष्टÑवादीला जिंकण्याची शाश्वती वाटत आहे. तसे झाले तर फोडाफोडीचा ‘फायदा’ मात्र येथे असणाºया मतदारांना होणार आहे.

टॅग्स :मुंबई