Female delivery in local | लोकलमध्ये महिलेची प्रसूती
लोकलमध्ये महिलेची प्रसूती

मुंबई : लोकलच्या महिला डब्यात प्रसूती झालेल्या महिलेला तत्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली. यामध्ये अंधेरी रेल्वे महिला पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने विशेष सहकार्य केले.
विरारहून जाणाऱ्या जलद लोकलमध्ये गुरुवारी महिला प्रसूत झाली, यावेळी लोकल अंधेरी स्थानकावर उभी होती. तत्काळ स्थानक अधीक्षकांनी उद्घोषणा केली की, अंधेरी स्थानकावरील फलाट क्रमांक ७ वरील लोकलमध्ये महिला प्रसूत झाली आहे. उद्घोषणा होताच कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस सुचिता वाळवे आणि हवालदार नवनाथ पांचाळ यांनी तातडीने लोकल गाठून महिलेची मदत केली. महिला पोलीस आणि आॅनड्युटी डॉक्टरांनी महिलेला रुग्णवाहिकेद्वारे कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिला, तिचे बाळ सुखरूप आहे.


Web Title:  Female delivery in local
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.