तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या वाहनांवर एफडीएने उगारला कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:47 AM2019-07-25T02:47:12+5:302019-07-25T06:17:47+5:30

परवाने केले रद्द, राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर २० जुलैपासून बंदी

FDA rescues crackdown on vehicles selling tobacco products | तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या वाहनांवर एफडीएने उगारला कारवाईचा बडगा

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या वाहनांवर एफडीएने उगारला कारवाईचा बडगा

Next

मुंबई : राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर २० जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईसह राज्यभरात तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच सुगंधी सुपारीचे उत्पादन, साठा व विक्री केल्यास त्याच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनाला बंदी असूनही वाहतुकीच्या मार्गाने राज्यात अशा पदार्थांची विक्री होते. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाºया वाहनांवर एफडीए प्रशासनाची करडी नजर असणार आहे. आतापर्यंत एफडीएने गुटखा विक्री करणाºया दोनशे वाहनांवर कारवाई केली असून अनेक वाहनांचे परवाने रद्द केले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात केली जाते. या वर्षीच्या तंबाखूजन्य पदार्थ बंदीच्या कायद्यामध्ये वाहनांचाही समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला राज्यात तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनावर बंदी होती. परंतु वाहतूक मार्गाने जो गुटखा विकला जात होता, त्याच्यावर दुर्लक्ष केले जायचे. आता वाहनांवरही बंदी लागू करण्यात आली असून वाहनांचा परवाना आणि आरटीओची नोंदणीदेखील रद्द केली जाणार आहे.

तंबाखूजन्य पदार्थांमध्ये सर्वप्रथम वाहनांवर कारवाई करण्याचा कायदा मंजूर करून घेण्यात आला आहे. त्यानुसार आता गुटखा विक्री करणाºया वाहनांवरदेखील एफडीएची करडी नजर आहे.

पुढील वर्षापर्यंत बंदी कायम
तंबाखू आणि सुपारीच्या उत्पादन, साठा आणि विक्रीवर २० जुलैपासून बंदी लागू करण्यात आली आहे. पुढील वर्षापर्यंत ही बंदी असेल. या आदेशांतर्गत तंबाखू उत्पादनाअंतर्गत येणाºया सुगंधित सुपारी, गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, खर्रा या पदार्थांचा समावेश केला जाणार आहे. शिवाय वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये पॅक करण्यात आलेल्या अनेक सुगंधी पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक करणाºया कंपन्यांनी आपली वाहने गुटखा वाहतुकीसाठी देऊ नयेत, असे आवाहन एफडीए प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: FDA rescues crackdown on vehicles selling tobacco products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.