Join us

फॅशन टीव्हीच्या मालकावर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:06 IST

ओशिवऱ्यात गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फॅशन टीव्ही (एफ टीव्ही)चा मालक कशिफ खान (२७) याच्याविरोधात ३१ वर्षीय ...

ओशिवऱ्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : फॅशन टीव्ही (एफ टीव्ही)चा मालक कशिफ खान (२७) याच्याविरोधात ३१ वर्षीय महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

पीडित तरुणी फेब्रुवारी २०२०मध्ये ब्रँड लायसन्स हेड म्हणून फॅशन टीव्हीमध्ये रुजू झाली. अमेरिकेत तिने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. नोव्हेंबर, २०२०मध्ये तिच्यासोबत खानने काही अश्लील चाळे केले, याचा विरोध करत तिने त्याला खडसावले. मात्र, त्यानंतर त्याने मोबाईलवर दारूच्या नशेत चूक झाल्याचा मेसेज पाठवत माफी मागितली. मात्र, त्यानंतरही तो सतत पाठलाग करुन त्याच्या मनातील तिच्याबद्दलची भावना बोलून दाखवत होता. त्यानंतर खानने पीडितेला व त्याच्या सेक्रेटरीला गोवा, हैदराबाद तसेच अन्य हॉटेलमध्ये क्लायंटला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले. याच दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याचा व्हिडीओ शूट केला. तसेच या प्रकाराची वाच्यता कुठेही केल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तिला व तिच्या कुटुंबाला दिल्याचा आरोप पीडितेने केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खानने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.