Join us  

रेमडेसिविर देण्याच्या नावाखाली होतेय बनावट इंजेक्शनची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:07 AM

टिळक नगर येथील महिलेची फसवणूक,पोलिसांकड़ून तपास सुरुलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वस्तात इंजेक्शन देण्याच्या नावाखाली टिळकनगर येथे ...

टिळक नगर येथील महिलेची फसवणूक,

पोलिसांकड़ून तपास सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्वस्तात इंजेक्शन देण्याच्या नावाखाली टिळकनगर येथे राहणाऱ्या महिलेला बनावट रेमडेसिविरची इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळकनगर परिसरात राहणाऱ्या मेघना हितेश ठक्कर (३८) यांना एका रूपेश गुप्ता नावाच्या व्यक्तीने कॉल करून स्वस्तात रेमडेसिविरचे इंजेक्शन देत असल्याचे सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून मित्राच्या खात्यावरून १८ हजार रुपये गुगल पेद्वारे ट्रान्सफर केले. सोमवारी रात्रीच्या सुमारास एक डिलिव्हरी बॉय एक पार्सल त्यांच्या हातात सोपवून निघून गेला.

त्यांनी पार्सल उघडताच त्यात रेमडेसिवीरचे बनावट इंजेक्शन मिळून आले. त्यांनी मंगळवारी दुपारी टिळकनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहेत आणि काळाबाजार करणाऱ्यांची माहिती पोलिसांना दया, असेही पोलिसांनी नमूद केले आहेत.