Join us

भीषण, भयावह पुराच्या घटनांमध्ये ६ पटींनी वाढ झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

अभ्यासातील निष्कर्ष; १७ जून, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिवसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्रातील भीषण, ...

अभ्यासातील निष्कर्ष; १७ जून, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्रातील भीषण, भयावह अशा पुराच्या घटनांमध्ये ६ पटींनी वाढ झाली असून, या सर्व घटना म्हणजे जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. दिवसागणिक हा धोका वाढतच असून, उद्योग क्षेत्रालाही जागतिक तापमान वाढीचे चटके बसू लागले आहेत.

काऊन्सिल फॉर एनर्जी एन्व्हार्यमेंट अँड वॉटरच्या एका अभ्यासानुसार, महाराष्ट्रातील ८० टक्क्यांहून अधिक जिल्हे दुष्काळ अथवा दुष्काळाशी संबंधित समस्यांना तोंड देत आहेत. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, पुणे, नाशिक आणि नांदेडसारखे जिल्हे दुष्काळाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांनी गेल्या १० वर्षांत पुराच्या घटना, वादळांसारखे बदल पाहिले आहेत.

महाराष्ट्रात मोठ्या, मध्यम आणि लहान अशा व्यावसायिकांसोबतही जागतिक तापमान वाढीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, जागतिक तापमान वाढीचा व्यावसायिक क्षेत्रांनादेखील फटका बसल्याचे समाेर आले. जागतिक तापमान वाढीचा फटका व्यावसायिकांना बसत आहे, असे ४५ टक्के व्यावसायिकांना वाटते.

मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, पूर, चक्रीवादळ, पाण्याच्या अभाव आणि वाढते तापमान अशी अनेक संकटे व्यावसायिकांभोवती घोंगावत आहेत. ४०० पेक्षा अधिक व्यावसायिकांशी याबाबत संवाद साधण्यात आला असून, ३७ टक्के व्यावसायिकांनी दावा केला आहे की, जागतिक तापमान वाढीचा फटका निसर्गातील प्रत्येक साखळीला बसला आहे.

..................................