Ganpatrao Deshmukh Death : कार्यकर्त्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला ध्येयवादी नेता, शरद पवारांकडून दु:ख व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 11:35 PM2021-07-30T23:35:23+5:302021-07-30T23:36:23+5:30

Ganpatrao Deshmukh Death : कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळच म्हणावा लागेल

Expressing grief from Sharad Pawar on ganpatrao deshmukh, the heroic leader who has won the undying love of the workers | Ganpatrao Deshmukh Death : कार्यकर्त्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला ध्येयवादी नेता, शरद पवारांकडून दु:ख व्यक्त

Ganpatrao Deshmukh Death : कार्यकर्त्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला ध्येयवादी नेता, शरद पवारांकडून दु:ख व्यक्त

googlenewsNext
ठळक मुद्देकष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळच

मुंबई/सोलापूर - सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते. त्यांच्या निधानानंतर राज्यातील दिग्गज नेत्यांकडून त्यांना सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आठवणी जागवत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 

कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळच म्हणावा लागेल. लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली ! अशा शब्दात शरद पवारांनी शोक व्यक्त केला आहे. 

54 वर्षे तालुक्याची सेवा

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.
 

Web Title: Expressing grief from Sharad Pawar on ganpatrao deshmukh, the heroic leader who has won the undying love of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.