Join us

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 02:01 IST

अख्खे जग कोरोना नावाच्या संकटाचा सामना करत आहे़ हा लढा सर्वांसाठीच नवीन आहे़ तरीही प्रत्येकजण आपआपल्यापरीने या युद्धाला सामोरा जात आहे़

अख्खे जग कोरोना नावाच्या संकटाचा सामना करत आहे़ हा लढा सर्वांसाठीच नवीन आहे़ तरीही प्रत्येकजण आपआपल्यापरीने या युद्धाला सामोरा जात आहे़ यामध्ये आपली माणसे गमल्याचे दु:ख, आर्थिक चणचण, आधाराची गरज, अबालवृद्धंची काळजी, असे अनेक विषय आहेत़ यामुळे येणारे नैराश्य, मानसिक खच्चीकरण, मनोधैर्य विचलित झालेल्या समाजमनाला सावरायला काय करता येईल? तुम्ही अडचणींवर मात कशी केली? स्वत:ला कसे सावरले? आपल्या आजूबाजूच्यांना काय सांगाल..? मान्यवरांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया.कोरोना रुपी संकट या अदृश्य शत्रूशी गेले चार महिने मुंबईकर लढत आहेत. सर्वांनी एकत्रित येऊन या विषाणूचा पराभव करू, अशी शपथ स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊया. हे दिवसही जातील, याचा विश्वास ठेवा. मात्र यासाठी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा- किशोरी पेडणेकर, महापौरकोरोना आजारामुळे नव्हे तर त्याच्या भीतीनेच रुग्ण धास्तावत आहे. त्यामुळे समाज मनातील ही भीती घालविण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विभाग पातळीवरही पालिका कर्मचारी, नगरसेवक, कार्यकर्ते प्रत्येकजण झटत होते. या विषाणूला मात दिल्यानंतर मुंबईकर पुन्हा नव्या ताकदीने उभा राहील- रवी राजा, विरोधी पक्षनेतेकोरोनाविरुद्धचा लढा दीर्घकालीन आहे. त्यात यशस्वी होण्यासाठी विधायक विचार, नियोजनपूर्वक आर्थिक व्यवस्थापन आणि व्यक्तिगत पातळीवर कौशल्य विकास या त्रिसूत्रीचा वापर आवश्यक आणि निर्णायक ठरेल. सार्वजनिक जीवन, आरोग्य, व्यवहार यात कोरोनामुळे मोठे बदल झाले आहेत. ते सकारात्मक भूमिकेने स्वीकारायला हवेत.- डॉ. निरंजन हिरानंदानी, अध्यक्ष, असोचेम आणि नरेडकोकोरोनाचे संकट आले आहे; पण त्यामुळे निराश होऊ नका, हिंमत हारू नका. ़आम्ही कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग, मास्क, निर्जंतुकीकरण याची काळजी घेत दैनंदिन कामे केली. लोकांनीही योग्य रीतीने काळजी घेऊन आपले व्यवहार करायला हवे़ प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, जास्त लोकांच्या संपर्कात जाऊ नये. संकट असले तरी आपले मनोधैर्य खचू देऊ नका. - शेखर चन्ने, परिवहन आयुक्तसामान्यांनी लॉकडाऊनच्या काळात शारीरिक - मानसिकदृष्ट्या कार्यक्षम असले पाहिजे, जेणेकरून आपोआप मनोवस्थेत ऊर्जा निर्माण होते.त्याचप्रमाणे आपल्या मनावर परिणाम करू शकणाऱ्या खळबळजनक बातम्या आणि समाज माध्यमांवर प्रसारित होणाºया पोस्ट्सकडे दुर्लक्ष करा. खात्री न करता कुठलीच बातमी आणि माहिती पसरवू नका.- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालयकोविड-१९ मुळे सर्वांना आरोग्याची निगा राखण्याचे प्रशिक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य या दोन बाबी स्पष्टपणे अधोरेखित झाल्यामुळे याचे बीज शालेय जीवनातच रोवण्याची गरज निर्माण झाली आहे. या स्वातंत्र्य दिनी प्रत्येकाने मानवी मूल्यांची जोपासणा करण्याचा संकल्प बाळगून मार्गक्रमण करावे़- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठप्राप्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी नवनव्या कल्पना, पर्याय शोधून काढावे लागतील. मी या संपूर्ण साडेपाच महिन्यांच्या कालावधीकडे माझ्या क्षेत्राच्या दृष्टीने काय करता येईल, हा विचार केला; आणि तेव्हा लक्षात आले की, स्वत:च्या ताणतणावाचा बडेजाव करण्याचे कारण नाही. इतरांपेक्षा आपला ताण कमी आहे हे समजले की, आपल्या ताणतणावाचे महत्त्व कमी होईल.- डॉ. आनंद नाडकर्णी, ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञमानसिक संतुलन सांभाळाअनपेक्षितरीत्या आपल्यापुढे कोरोनाचे संकट उभे राहिल्याने जिल्हावासीयांनी आपले मानसिक संतुलन कुठेही विचलित होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या ५ मार्चपासून मी नियमित माझ्या कार्यालयात उपस्थित राहात असून सकाळी उठून योगासनाद्वारे मानसिक स्वास्थ्य राखण्याचा प्रयत्न करतो. आहाराच्या वेळी नाचणीची भाकरी आणि पालेभाज्या असा संतुलित आहार घेत बाहेरचे अन्न, जंकफूड खाण्याचे टाळतो.- डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघरसूचनांचे काटेकोर पालन कराजिल्हावासीयांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपण कोरोना या आजाराला यशस्वीपणे दूर ठेवू शकतो. शक्यतो घराबाहेर न पडता अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे आदी बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. मी स्वत: नियमित कार्यालयात येत असून अनेक समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या, कर्मचाऱ्यांना भेटत असताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेते.- भारती कामडी, जिल्हा परिषद अध्यक्ष, पालघर.कोरोनाचे हे संकट केव्हा तरी संपायला हवे आणि ते लवकरच संपेल, अशी आपण आशा करू या. तोपर्यंत प्रत्येकाने आपल्या मनाला पटतील, असे नावीन्यपूर्ण उपक्रम शोधावेत. त्यात मन गुंतवावे. या लॉकडाऊनदरम्यान माझे काम तर पूर्वीपेक्षा अधिक वाढले. कामानिमित्तचा प्रवासाचा वेळ वाचला. त्या वेळेचा सदुपयोग करता आला.- डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञटेस्टींग - ट्रेसिंगच्या पोकळ बाता मारण्याची ऐवजी प्रत्यक्ष कामावर भर द्यावा लागणार आहे. वैद्यकीय आघाडीवर पायाभूत सुविधांचा विकास नेटाने करावा लागणार आहे. पुन्हा एकदा मुंबई शहर आणि देशातील जनता मुक्त वातावरणात, स्वच्छंदपणे स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेईल, यासाठी सरकारांनीसुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.- संजय निरूपम, काँग्रेस नेतआज कोरोनामुळे संपूर्ण जगच जणू परावलंबी आयुष्य जगत आहे. सुरक्षित अंतर ठेवून आपली कामे करूया. फेस कवरचा वापर करणे, हात धुणे, आपला परिसर स्वछ ठेवणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी करून कोरोनावर विजय मिळवूया. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योजनांचा लाभ घेऊन देशाला आत्मनिर्भर बनवूया. स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! - पूनम महाजन, खासदार , भाजपा नेत्याविशेषत: युवा वगार्ला माझी कळकळीची विनंती आहे, धीर धरा. लढत रहा. देशाला, समाजाला आणि तुमच्या कुटुंबियांना तुमची गरज आहे. तुम्ही देशाचे भविष्य आहात. मला खात्री आहे की, कोरोनानंतरचा काळ हा भारताचाच असणार आहे. जगभरात आपल्या कोरोना लढ्याची विजयगाथा सोनेरी अक्षरात लिहिली जाणार आहे.- मिलिंद देवरा, काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्रीया संकट काळात ईश्वराचा आधार मोठा आहे. सतत चांगले काही वाचत राहिले पाहिजे. मुद्दाम वेळ काढून आपल्या आवडीच्या विषयातील वाचन या काळात वाढवले पाहिजे. आपल्या भोवती सतत सकारात्मक वातावरण राहील असे पाहावे. मी स्वत: सकारात्मक विचार करतो, ईश्वराची पूजा करतो आणि ठराविक दिनचर्या सांभाळण्याचा प्रयत्न करतो.- मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्षमुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: हार्ट पेशंट असूनही महाराष्ट्राच्या जनतेसाठी या संकटात लढा देत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत मतदारसंघात कामे सुरू केली. मुंबई महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने, माझ्या मतदारसंघातील हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यात आम्हाला यश आले. - राहुल रमेश शेवाळे, खासदारकोरोनाच्या काळात या आजाराच्या भीतीने असो वा लॉकडाऊनमुळे मानसिक ताण, नैराश्य येणे स्वाभाविक आहे. मात्र त्यावर नियंत्रण मिळवून संयम बाळगला पाहिजे. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांत परिचारिका असूनही थोडी धास्ती वाटत होती, दूरवर राहणाºया कुटुंबाची काळजी वाटत होती. मात्र रुग्णसेवेचे व्रत स्वीकारल्यामुळे मी खंबीर झाले आणि कामाला लागले. - दीपाली पाटील, परिचारिका

टॅग्स :स्वातंत्र्य दिन