नाल्यातील गाळ मुंबईबाहेर टाकण्यासाठी 6 कोटींचा खर्च, प्रस्तावाला विरोधी पक्षाकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 08:10 AM2021-01-19T08:10:35+5:302021-01-19T08:10:42+5:30

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून गाळ काढण्यात येतो. ही कामे विभाग कार्यालय स्तरावर करण्यात येतात; मात्र लहान नाल्यांमधील गाळ सुकण्यासाठी रस्त्यालगतच ठेवण्यात येत असल्याने हा गाळ बराच काळ पडून राहिल्यास रहदारीला अडथळा निर्माण होतो. तसेच, परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो.

Expenditure of Rs 6 crore for disposal of Nala sludge out of Mumbai | नाल्यातील गाळ मुंबईबाहेर टाकण्यासाठी 6 कोटींचा खर्च, प्रस्तावाला विरोधी पक्षाकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता

नाल्यातील गाळ मुंबईबाहेर टाकण्यासाठी 6 कोटींचा खर्च, प्रस्तावाला विरोधी पक्षाकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता

Next

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. मात्र नाल्यातून काढलेला गाळ सुकण्यासाठी ठेकेदार रस्त्यावरच ठेवत असतो. परिणामी हा गाळ पुन्हा नाल्यांत गेल्याने सफाईचे उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यामुळे रस्त्यालगतच्या लहान नाल्यांमधून काढलेला गाळ गोळा करून वाहनांद्वारे भिवंडी परिसरातील खासगी जागेत टाकण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिका ठेकेदाराला तब्बल सहा कोटी रुपये मोबदला देणार आहे. मात्र महापालिका आर्थिक संकटात असताना, या प्रस्तावाला विरोधी पक्षाकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून गाळ काढण्यात येतो. ही कामे विभाग कार्यालय स्तरावर करण्यात येतात; मात्र लहान नाल्यांमधील गाळ सुकण्यासाठी रस्त्यालगतच ठेवण्यात येत असल्याने हा गाळ बराच काळ पडून राहिल्यास रहदारीला अडथळा निर्माण होतो. तसेच, परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. यासाठी हा गाळ गोळा करून वाहनांद्वारे उचलून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. 

मात्र गेल्यावर्षी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा कालावधी संपुष्टात येत असल्याने ही सुविधा भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या.

Web Title: Expenditure of Rs 6 crore for disposal of Nala sludge out of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.