Join us  

मुंबईत भरणार दुर्मीळ पक्ष्यांचे प्रदर्शन

By admin | Published: April 27, 2015 4:39 AM

आफ्रिकन गोल्डन ब्रीस्टेड फिंच, आफ्रिकन ग्रे पॅरोट, अ‍ॅमाझोन पॅरोट, ब्लीडींग हार्ट डव, ब्ल्यू अँड गोल्ड मकाव बेबीज, बुर्क परकीटस, बुडगेरीगर, कॅनरी, सिन्नामोन कॉनुर

मुंबई : आफ्रिकन गोल्डन ब्रीस्टेड फिंच, आफ्रिकन ग्रे पॅरोट, अ‍ॅमाझोन पॅरोट, ब्लीडींग हार्ट डव, ब्ल्यू अँड गोल्ड मकाव बेबीज, बुर्क परकीटस, बुडगेरीगर, कॅनरी, सिन्नामोन कॉनुर, कॉकटेल बर्ड, एक्लेकटस पॅरोट, गालाह कॉकॅटू, गोल्डन फिसंट, गोल्डीश फिंच असे एक ना अनेक दुर्मीळ पक्षी पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत बालदोस्तांसाठी पक्ष्यांच्या दुनियेची ही सफर गोल्डन चान्स ठरणार आहे.ग्रीन विंग मकाव्स, सल्फर कॉच्कातू, हंस, मकाव, जावा फिंच, ग्रीन विंग मकाव, सल्फुर कॉकटू, हंस मकाव, जावा फिंच, लेडी अमेठीस्ट फिसंट, लोरीकीटस, मंडारीन हे सर्व पक्षी ‘वर्ल्ड आॅफ विंग्स’मध्ये रसिकांना पाहायला मिळणार आहेत.मुंबईकरांना पहिल्यांदाच ‘वर्ल्ड आॅफ विंग्स’ हे अनोखे असे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. दुर्मीळ पण घरगुती अशा १५०हूनही अधिक पक्ष्यांचे हे प्रदर्शन माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात ३० एप्रिल ते ४ मे २०१५ या काळात सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. त्याशीवर डक, मोलुक्कन कॉकॅटू, नेकेड आय कॉकॅटू, नांदे कॉनूर, नॉर्मल क्वॅलीस, आऊल फिंच, पाम कॉकॅटू, पॅरोट सिंच, पॅरोटलेट्स, क्वॅकर पॅरोट, रेड आयब्रो आफ्रिकन फिंच, रोसेल्ला बर्ड, स्कार्लेट मकाऊ, सेनेगल पॅरोट, स्प्लेंडीड पराकीट, सन कॉनूर, टर्क्वाईस पॅरोट, यलो सायडेड कॉनूर आणि झेब्रा फिंच हे पक्षीही ‘वर्ल्ड आॅफ विंग्स’मध्ये असणार आहेत. या प्रदर्शनाला अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया यांनी परवानगी दिल्याबद्दल आभारी आहोत.या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांना पक्ष्यांबद्दल माहिती तर दिली जाईलच; पण त्याचबरोबर त्यांचे निरीक्षण हे त्यांच्यासाठी एक पर्वणी असेल, असे उद्गार ‘वर्ल्ड आॅफ विंग्स’चे आयोजक लौकिक सोमण यांनी काढले.