Join us  

आॅनलाइन मोबाइल खरेदीचा धूमधडाका, तरुणाईसह सर्वांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 7:37 AM

दिवाळीनिमित्त आॅनलाइन शॉपिंगचा धूमधडाका सध्या सुरू आहे. सरसकट सर्व आॅनलाइन शॉपिंग साइटवरती दिवाळी आॅफर्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे.

मुंबई : दिवाळीनिमित्त आॅनलाइन शॉपिंगचा धूमधडाका सध्या सुरू आहे. सरसकट सर्व आॅनलाइन शॉपिंग साइटवरती दिवाळी आॅफर्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या शॉपिंग साइटमध्ये आॅफर्स देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी दुकानांपेक्षा कमी किमतीत आणि विविध प्रकारच्या असंख्य मोबाइलची उपलब्धता असल्याने, तरुण वर्गाने मोबाइल खरेदीसाठी आॅनलाइनकडे मोर्चा वळविला आहे. सध्या विविध जाहिरातींच्या माºयाने सगळे मोबाइल यूजर हैराण झाल्याचे चित्र आहे.आॅनलाइन शॉपिंग साइटवर मोबाइलबाबतची सर्व तांत्रिक माहिती उपलब्ध आहे. अनेक मोबाइलमध्ये तुलना करून पाहता येत असल्याने, आॅनलाइन शॉपिंग साइटना पसंती दिली जाते, तसेच मोबाइल घेतल्यानंतर जर तो आवडला नाही, तर तो परत करून दुसरा मोबाइल घेण्याची सोयदेखील आॅनलाइन शॉपिंग साइटवर उपलब्ध आहे.पुरेसे पैसे नसतील, तर ‘झीरो डाउनपेमेंट’ किंवा ‘लो डाउनपेमेंट’ करून मासिक हप्त्यांवर मोबाइल खरेदीचा पर्यायही आॅनलाइन शॉपिंग साइटवर आहे. यासाठी बँकेत न जाता, कोणतेही पेपरवर्क न करता कमीतकमी किमतीत मोबाइल खरेदीची सोय साइटतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच या साइटवर सहा महिन्यांपर्यंत वॉरंटी असलेले सेकंड हँड मोबाइलही खरेदी करता येतात. त्यामुळे मोबाइल खरेदीसाठी आॅनलाइनलाच पसंती असल्याचे चित्र आहे.मोबाइल एक्स्चेंजजर कोणाला नवीन मोबाइल खरेदी करायचा असेल, परंतु सध्या त्याच्याकडे जुना मोबाइल आहे आणि तो मोबाइल चांगल्या स्थितीत असल्यास, तो देऊन नवीन मोबाइल खरेदी करता येतो. जुन्या मोबाइलच्या बदल्यात नवीन मोबाइलच्या किमतीत एक ते पाच हजार अथवा मोबाइलची किंमत१० ते २० टक्क्यांनी कमी केली जाते.सेकंड हँड विथ वॉरंटीसेकंड हँड मोबाइलवर वॉरंटी नसते, असा सर्वसाधारण समज आॅनलाइन शॉपिंग साइट्सने खोडून काढला आहे. अनेक शॉपिंग साइट्स सेकंड हँड मोबाइलची विक्री करत असून, यासाठी तीन ते सहा महिन्यांची वॉरंटीसुद्धा देत असल्यामुळे, सेकंड हँड मोबाइल खरेदीलाही चांगला प्रतिसाद आहे. ‘स्नॅपडील’ने हा पर्याय लोकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.मोबाइल कसा निवडावा?मोबाइलसाठी सर्वांत महत्त्वाचा आहे प्रोसेसर. प्रोसेसरमध्ये क्वार्ड कोअर आणि क्वालकोम स्नॅपड्रॅगन हे प्रकार चांगले असल्याचे या क्षेत्रांतील जाणकारांचे मत आहे. क्वालकोम स्नॅपड्रॅगनमध्ये क्वालकोम स्नॅपड्रॅगन २००, क्वालकोम स्नॅपड्रॅगन ४००, क्वालकोम स्नॅपड्रॅगन ६००, क्वालकोम स्नॅपड्रॅगन ८०० असे प्रकार आहेत.चांगल्या क्लीअ‍ॅरिटीचे फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी बॅक आणि फ्रंट कॅमेरे किमान ८ मेगा पिक्सलपेक्षा जास्त असावेत, तसेच मोबाइल हा वॉटर रेजिस्टंट असला, तर अधिक चांगले असते. कारण मोबाइल जर पाण्यात भिजला, तर तो पुन्हा सुरू होत नाही. जर सुरू झालाच तर तो हँग होतो, चार्ज होत नाही किंवा त्याचा स्पीकर खराब होतो, पण काही मोबाइल कंपन्यांनी वॉटर रेजिस्टंट मोबाइल बाजारात आणले आहेत.मोबाइल हातातून पडला की, त्याचा डिसप्ले फुटतो आणि ३ ते ४ हजारांचा भुर्दंड ग्राहकाला बसतो. अशी दुर्घटना टाळण्यासाठी गोरीला ग्लास असलेला मोबाइल घ्यावा. मोबाइल वापरण्यासाठी बॅटरीसुद्धा महत्त्वाची आहे. एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभरात पुन्हा मोबाइल चार्ज करावा लागू नये, अशी सर्वांची अपेक्षा असते. त्यामुळे किमान ३००० मेगा अ‍ॅम्पियर बॅटरी असावी.‘क्वीक चार्जिंग सपोर्ट’हल्ली लोकांना मोबाइलचे इतके व्यसन आहे की, त्यांना तासभरही मोबाइल स्वत:पासून दूर ठेवता येत नाही. असे लोक मोबाइल एक ते दोन तास चार्जिंगला लावू शकत नाहीत. या मोबाइलवेड्या लोकांसाठी विविध कंपन्यांनी झटपट चार्ज होणारे मोबाइल बाजारात आणले आहेत.‘मल्टिटास्कर्स’साठी रॅममोबाइलमध्ये रॅम हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. रॅम जितका जास्त असेल, तितका मोबाइल फास्ट वापरता येता. मोठे गेम्स, अ‍ॅप्स इन्स्टॉल करता येतात. मल्टिटास्किंग करण्यासाठी रॅमला विशेष महत्त्व आहे. साधारणपणे मोबाइलमध्ये किमान २ जीबी रॅम असणे आवश्यक आहे.

टॅग्स :दिवाळीमोबाइल