शाळा बंद असूनही अभ्यास मात्र सुरूच...! , स्टडी फ्रॉम होममुळे मुले कंटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 07:15 AM2020-05-21T07:15:09+5:302020-05-21T07:15:15+5:30

लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होऊन मे महिना संपत आला तरी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी न मिळाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी असे दोन्ही वर्ग आता कंटाळले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Even though the school is closed, the study continues ...! , Study from home bored kids | शाळा बंद असूनही अभ्यास मात्र सुरूच...! , स्टडी फ्रॉम होममुळे मुले कंटाळली

शाळा बंद असूनही अभ्यास मात्र सुरूच...! , स्टडी फ्रॉम होममुळे मुले कंटाळली

Next

मुंबई : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्थांना आणि शाळांना स्टडी फ्रॉम होमच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पालिका शाळांतील शिक्षक, अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळांतील शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आॅनलाइन लेक्चर्स घेऊन अभ्यास घेत आहेत. लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होऊन मे महिना संपत आला तरी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी न मिळाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी असे दोन्ही वर्ग आता कंटाळले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शिक्षण विभागाचा शाळा बंद अभ्यास सुरू हा वर्ग अजून किती दिवस चालू राहणार, असा प्रश्न विद्यार्थी शिक्षक विचारू लागले आहेत.
शिक्षण विभागाने किमान पुढील शैक्षणिक वर्षाची घोषणा
करून त्याआधी काही दिवस उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थी शिक्षक करू लागले आहेत.
पुढील शैक्षणिक वर्षाची कोणतीही कल्पना न देता शिक्षकांना स्टडी फ्रॉम होमसाठी शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्याचे तसेच विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. हे करताना सगळ्याच विद्यार्थ्यांकडे आॅनलाइन लर्निंगसाठी आवश्यक सुविधा असतीलच असे नाही याचा विचार केलेला नाही.
त्यामुळे एका ठरावीक विद्यार्थी समूहाला शिकविताना इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय करायचे याची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही़ त्यामुळे शिक्षकांना सगळ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करून घ्यायचा याचे कोडे पडले असल्याची प्रतिक्रिया लोकशाही शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली.
लर्न फ्रॉम होम उपक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक आता कंटाळले असून त्यांना आता आरामाची गरज असल्याचे मत व्यक्त करत, किमान शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची माहिती देत उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

1शिक्षकांना आॅनलाइन शिक्षण, प्रशिक्षण, कोरोनासंबंधित कामे, त्याचप्रमाणे शाळांचे पहिली ते आठवी, नववी-अकरावी आणि दहावी-बारावीच्या निकालांमधून उसंत घ्यायलाही वेळ नाही. अशा परिस्थितीत आता आॅनलाइन लर्निंगच्या कामातून त्यांनाही सुट्टी आवश्यक असल्याचे मत पंड्या यांनी व्यक्त केले.
2सुट्टी नाही मिळाली तरी निदान त्यांच्यावरील कामाचे ओझे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केल्यास कमी होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थी, शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि या दोघांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title: Even though the school is closed, the study continues ...! , Study from home bored kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.