Join us  

इंजेक्शन अॅलर्जीची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन

By admin | Published: August 21, 2014 1:56 AM

सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलांची देखील प्रकृती आता स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.

मुंबई : सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलांची देखील प्रकृती आता स्थिर असून त्यांना  डिस्चार्ज देण्यात येईल. दरम्यान, इंजेक्शन अॅलर्जी प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, असे वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले. 
पुरूष वॉर्डमध्ये पण चौघांना या इंजेक्शनची अॅलर्जी झाली होती. मात्र आता चौघांची ही प्रकृती स्थिर आहे. 
सायरा शेख ही कुर्ला परिसरामध्ये राहायची. 15 ऑगस्ट रोजी तिचे डोके दुखायला लागले होते. हवेत होणा:या बदलांचा परिणाम म्हणून तिला डोकेदुखीचा त्रस होत असेल असे आम्हाला वाटले. शनिवारी दुपारी तिला थोडा ताप आला. मग आम्ही तिला डॉक्टरकडे नेले. रक्त तपासणी केल्यावर तिला टायफॉईड झाल्याचे कळले. 17 ऑगस्टला सायराला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे नूरमहम्मद यांनी सांगितले.
18 ऑगस्टला रात्री 9 वाजेर्पयत नूरमहम्मद तिच्याबरोबर होते. ‘ती म्हणत होती, मला बर वाटते आहे. आम्ही एकत्र जेवलो. मग रुटीननुसार नर्सने तिला इंजेक्शन दिले. साधारण साडेआठच्या सुमारास तिला इंजेक्शन दिले. तेव्हा ती नीट होती. रात्री 1क्.45 च्या सुमारास त्या वॉर्डातील 28 महिलांना एकदम त्रस सुरू झाला. तिला हिरव्या रंगांची उलटी झाली. तिच्या पोटात जळजळ व्हायला लागली होती. यानंतर तिला ऑक्सिजन लावावा लागला. सगळ्य़ांनाच असे व्हायला लागल्यावर धावपळ सुरू झाली. रुग्णालयात तीन ते चारच रुग्णवाहिका होत्या. मग 1क्8 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवल्या होत्या. सायराला सव्वा बारा, साडेबाराच्या सुमारास रुग्णवाहिका मिळाली. मग आम्ही रात्री पाऊणच्या सुमारास केईएम रुग्णालयात पोहचलो. मात्र अतिदक्षता विभागात ठेवल्यावर तिच्याशी बोलणो झाले नाही,’ असे नूरमहम्मद यांनी सांगितले. काल रात्री 11.3क् वाजता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  शवविच्छेदन जे.जे. रुग्णालयात करावे अशी विनंती आम्ही पोलिसांनी केली होती. त्यांनी ती मान्य केली, असेही ते म्हणाले
नूरमहम्मद हे इस्टेट एजंट आहेत. त्यांना 23 वर्षाचा मुलगा  आणि 21 वर्षाची मुलगी आहे. (प्रतिनिधी)
 
च्तापांच्या रुग्णांसाठी सेफोटॅक्ङिाम आणि सेफ्ट्रीअॅक्झोन ही इंजेक्शन सर्वसामान्यपणो वापरली जातात. ही दोन्ही प्रतिजैविके कुर्ला भाभा रुग्णालयामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीपासून वापरायला सुरूवात केलेली आहेत. 
च्सेफोटॅक्ङिामच्या 3 हजार बाटल्या आल्या होत्या, तर  सेफ्ट्रीअॅक्झोनच्या 3 हजार 714 बाटल्या आल्या होती. 
 
च्महापालिकेच्या मेडिसीन आणि फार्माेकॉलॉजी विभागाच्या डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात येणार असून कशामुळे अॅलर्जी झाली याचा शोध हे डॉक्टर घेणार आहेत.