Join us

म्हाडाने पाठविलेल्या प्रथम सूचनापत्रात चुका

By admin | Updated: October 10, 2015 04:12 IST

म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत लॉटरीतील विजेत्यांना प्रथम सूचनापत्रासोबत पाठविण्यात आलेल्या चेकलिस्टमध्ये अनेक चुका झाल्या आहेत. विजेत्यांनी या चुका मंडळाच्या

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत लॉटरीतील विजेत्यांना प्रथम सूचनापत्रासोबत पाठविण्यात आलेल्या चेकलिस्टमध्ये अनेक चुका झाल्या आहेत. विजेत्यांनी या चुका मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंडळाने तातडीने शुद्धीपत्रक काढून आपल्या चुकांवर पांघरुण टाकले आहे.कोकण मंडळाने विरार-बोळिंज येथील १ हजार ७१६ घरांची लॉटरी जुलै २0१४ मध्ये काढली होती. तब्बल दीड वर्ष उलटले तरी विजेत्यांना म्हाडाकडून कोणतेही पत्र पाठविण्यात आले नव्हते. अखेर म्हाडाने विजेत्यांना नुकतेच प्रथम सूचनापत्र पाठविले आहे. या सूचनापत्रानुसार मंडळाने विजेत्यांना २६ आॅक्टोबरपर्यंत अ‍ॅक्सिस बँकेत कागदपत्रे जमा करण्याची मुदत दिली आहे.मंडळाने विजेत्यांना सूचनापत्रासोबत पाठविलेल्या चेकलिस्टमध्ये अनेक चुका असल्याने विजेत्यांनी मंडळाकडे विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. सूचनापत्रासोबतच्या चेकलिस्टमधील पान क्रमांक १७ वर अर्जदाराचे उत्पन्नाचे २0१२-१३ वर्षाचे प्रमाणपत्र असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच प्रमाणपत्रांच्या नमुन्यांवरही मुंबई मंडळ असा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे नमुना क्रमांक ई मध्ये नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून बृहन्मुंबई असा उल्लेख झाला आहे.या चुकांमुळे विजेते संभ्रमात होते. अखेर मंडळाने अर्जदारास उत्पन्नाचे प्रमाणपत्र २0१३-१४ आणि मुंबई मंडळ असा उल्लेख असलेल्या ठिकाणी कोकण मंडळ आणि नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून बृहन्मुंबईऐवजी वसई-विरार शहर महानगरपालिका असे वाचावे असे शुद्धीपत्रक मंडळाला प्रसिद्ध करावे लागले आहे.चुकांमुळे विजेते संभ्रमातमंडळाने विजेत्यांना सूचनापत्रासोबत पाठविलेल्या चेकलिस्टमध्ये अनेक चुका असल्याने विजेत्यांनी मंडळाकडे विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. सूचनापत्रासोबतच्या चेकलिस्टमधील पान क्रमांक १७ वर अर्जदाराचे उत्पन्नाचे २0१२-१३ वर्षाचे प्रमाणपत्र असा उल्लेख करण्यात आला आहे.