Join us  

आयआयटी घडवणार विद्यार्थ्यांमधून उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 3:16 AM

संचालकांची माहिती; छोट्या अभ्यासक्रमांची आखणी

मुंबई : आयआयटी मुंबईतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात येते. पण आयआयटीने आता विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने आयआयटीने विद्यार्थ्यांसाठी छोटेछोटे अभ्यासक्रम आणि बाजारपेठा उपलब्ध करून देण्याबरोबरच संशोधनासाठी विविध कंपन्यांबरोबरच सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतल्याचे आयआयटी बॉम्बेचे नवनियुक्त संचालक प्राध्यापक सुभासिस चौधरी यांनी सांगितले.प्र्राध्यापक चौधरी यांनी आयआयटी मुंबईचा पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आयआयटी मुंबईतील अ‍ॅकॅडमी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर अफेअरचे प्रमुख व उपसंचालक प्राध्यापक ए. के. सुरेश व फायनान्स अ‍ॅण्ड एक्स्टर्नल अफेअरचे प्रमुख व उपसंचालक प्राध्यापक पी. एम. मुजुमदार उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी लिबरल स्टेम प्रक्रियाआयआयटी म्हणजे संशोधक अभियंते यांचे माहेरघर. मात्र अनेकदा प्रवेश निश्चित केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला इंजिनीअरिंगमध्ये रस नाही किंवा आपण त्यात जास्त काही करू शकत नाही याची जाणीव होते. ही बाब लक्षात घेऊन आयआयटीतर्फे मुंबईने अशा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी लिबरल स्टेम ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २०२० मध्ये आयआयटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी शक्यता असल्याचे आयआयटीचे संचालक प्राध्यापक सुभासिस चौधरी यांनी सांगितले.