Join us  

परगावच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात ५० मिनिटे उशिरा येण्याची मुभा अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 3:25 AM

नव्या नियमामुळे कोंडी; शासनानेच काढलेल्या परिपत्रकाचा आधार

मुंबई : कर्जतपलिकडे आणि पुण्यापर्यंत राहणाऱ्या आणि मुंबईत शासकीय कार्यालयांत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर ५० मिनिटे उशिरा येण्याची मुभा देणारे शासनाचेच परिपत्रक कायम असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.१५ आॅक्टोबर १९९३ रोजी हे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले होते. त्यानुसार कर्जतपलिकडे आणि पुण्यापर्यंतच्या ठिकाणांवरून मुंबईत येणाºया कर्मचाºयांना ५० मिनिटे उशिरा येण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, त्याच परिपत्रकात हेही स्पष्ट केले होते की, उशिरा येण्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होणार नाही याची काळजी कर्मचाºयांनी घ्यावी. उशिरा येण्याच्या बदल्यात कर्मचाºयांनी दरवर्षी सहा नैमित्तिक रजा किंवा चार नैमित्तिक रजा व वैकल्पिक रजा शासनाला समर्पित कराव्यात. तसेच वर्षाच्या सुरुवातीला तसे लिहून द्यावे.परिपत्रकात काय म्हटले आहे?परिपत्रकाचा आधार घेत कर्जत ते पुणे पट्टयातून मुंबई येणारे कर्मचारी बरेचदा विलंबाने कार्यालयात येतात पण त्यापैकी किती कर्मचारी त्याच परिपत्रकातील तरतुदीनुसार रजा समर्पित करत नाहीत, असे मोठ्या प्रमाणात आढळते. कर्जतपलिकडून मुंबईत येणाºया कर्मचाºयांना संध्याकाळी कार्यालय लवकर सोडण्याची मुभा नसेल, असेही १९९३ च्या त्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र, पुण्याला दररोज जाणाºया रेल्वेगाड्या गाठता याव्यात म्हणून अनेक ठिकाणचे कर्मचारी आधीच निघून जातात असा अनुभव आहे.