Join us  

एल्फिन्स्टनचा गर्डर उभा राहिला! मध्य, पश्चिम रेल्वेवर विशेष ब्लॉक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 5:50 AM

लष्कराकडून उभारल्या जाणा-या परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेतर्फे २७ आणि २८ जानेवारी रोजी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेनेही २७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ब्लॉक घेऊन कामे सुरू केली आहेत. त्यासाठी काही लोकल फेºया रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई -  लष्कराकडून उभारल्या जाणा-या परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेतर्फे २७ आणि २८ जानेवारी रोजी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेनेही २७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ब्लॉक घेऊन कामे सुरू केली आहेत. त्यासाठी काही लोकल फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी एल्फिन्स्टन पुलासाठीचा गर्डर उभारण्यात आला आहे.एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेला जाग आली. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर रेल्वेने कामांचा धडाका लावला आहे. त्यापैकीच एक म्हणजे परळ-एल्फिन्स्टन स्थानकावरील पुलाचे काम. या पुलाचे काम लष्कराने हाती घेतले आहे. पूल तीन टप्प्यांमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर २७ जानेवारी रोजी मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. २८ जानेवारी रोजी मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चारही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेवर २७ जानेवारीला डाऊन धिम्या मार्गावर मध्यरात्री १२.५० ते सकाळी ६.२० आणि अप धिम्या मार्गावर मध्यरात्री दीड ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आल्याने धिम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या होत्या.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकल