वीज ग्राहकांना शॉक कायम : जूनमध्ये ४८ हजार तक्रारी; ग्राहक सेवेसाठी आता व्हिडिओ कॉलिंग  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:55 PM2020-07-08T17:55:49+5:302020-07-08T17:56:37+5:30

वाढीव वीज बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले असतानाच जूनमध्ये ग्राहकांकडून ४८ हजार तक्रारी आल्या आहेत.

Electricity consumers shocked: 48,000 complaints in June; Video calling now for customer service | वीज ग्राहकांना शॉक कायम : जूनमध्ये ४८ हजार तक्रारी; ग्राहक सेवेसाठी आता व्हिडिओ कॉलिंग  

वीज ग्राहकांना शॉक कायम : जूनमध्ये ४८ हजार तक्रारी; ग्राहक सेवेसाठी आता व्हिडिओ कॉलिंग  

googlenewsNext


मुंबई : वाढीव वीज बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले असतानाच जूनमध्ये ग्राहकांकडून ४८ हजार तक्रारी आल्या आहेत. यातील बहुतेक तक्रारींचे निराकरण झाले आहे. सुमारे २ हजार १११ तक्रारी पडताळणी व निराकरणाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. थकबाकी २५० कोटी रुपयांवरून ७५० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. लॉकडाउन सुरू झाला त्या काळात सुमारे २.५ लाख ग्राहकांनी थकबाकी भरलेली नव्हती. ही संख्या मे २०२० या कालावधीत ७.७ लाखांनी वाढली आहे. ग्राहकांना बिले स्पष्ट करून सांगण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर सुमारे ३.५ लाख ग्राहकांनी थकबाकी भरली आहे. सुमारे ६.७ लाख ग्राहकांकडे बिलांची थकबाकी आहे, अशी माहिती अशी माहीत अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या परिषदेत देण्यात आली.


मार्च २० ते मे २० दरम्यान पाठवण्यात आलेली बिले ही त्यापूर्वीच्या ३ महिन्यांच्या म्हणजेच डिसेंबर २०१९ ते मार्च २०२०  या काळातील कमी वीजवापराच्या हिवाळी महिन्याच्या सरासरी वापराच्या आधारे तयार करण्यात आली होती. लॉकडाउनच्या काळात तयार करण्यात आलेली बिले ही प्रत्यक्ष वापराच्या तुलनेत कमी होती. ऊन्हाळा तसेच घरून काम करण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे प्रत्यक्ष वीजवापर अधिक होता. घरून काम करण्यामुळे हिवाळ्यातील वीजवापर व प्रत्यक्ष वीजवापरातील फरक आणखी सुमारे २० टक्क्यांनी वाढला. एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे सुमारे ११,३०० आणि ३५,१२० मीटर रिडींग ग्राहकांकडून प्राप्त झाले. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर २५ व्हर्च्युअल हेल्प डेस्क्स आहेत. यांवरून व्हिडिओ कॉल्स केले जातात, असेही परिषदेत सांगण्यात आले.

Web Title: Electricity consumers shocked: 48,000 complaints in June; Video calling now for customer service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.