Join us  

डबेवाल्यांच्या मदतीला इलेक्ट्रिक सायकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:44 PM

मुंबईचे डबेवाले आता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अत्याधुनिक ‘ई-सायकल’वरून डबे पोहोचवताना पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेतर्फे प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला २५ डबेवाल्यांना या अत्याधुनिक सायकली देण्यात येतील.

मुंबई : मुंबईचे डबेवाले आता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अत्याधुनिक ‘ई-सायकल’वरून डबे पोहोचवताना पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेतर्फे प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला २५ डबेवाल्यांना या अत्याधुनिक सायकली देण्यात येतील.पहिल्या टप्प्यातील पाच सायकली डबेवाल्यांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामागची संकल्पना मांडताना शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले,‘प्रदूषणमुक्त, पर्यावरणयुक्त मुंबई’ या मोहिमेअंतर्गत ई-वाहनांचे विविध पर्याय चाचपून पाहिले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डबेवाल्यांचा त्रास कमी करण्याबरोबरच डब्यांचे वितरण अधिक जलद व्हावे यादृष्टीने इलेक्ट्रिक सायकली दिल्या जाणार आहेत.या सायकलची बॅटरी घरी नेऊन चार्ज करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे पायडल आणि बॅटरी या दोन्ही पर्यायांच्यामाध्यमातून ही सायकल चालवता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.दोन तासांत ‘बॅटरी फुल्ल’- या सायकलमध्ये लिथेनियम बॅटरी असून ती वजनाने हलकी आहे. दोन ते अडीच तासांत ही बॅटरी पूर्ण चार्ज होते. बॅटरीवर ही सायकल १०० किलोमीटरपर्यंत चालू शकते.- डबेवाल्यांच्या नेमक्या गरजा जाणून घेतल्यानंतर या सायकलमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील, अशी माहिती मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे सुभाष तळेकर यांनी दिली.- या सायकलची किंमत सुमारे ३५ हजार रुपयांच्या घरात असून, विल्सन जिमखान्यात या ई-सायकलींचे वाटप करण्यात आले.- या सायकलच्या मागील बाजूस असलेल्या कॅरियरवर जेवणाचे डबे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई डबेवाले