eight peoples were injured in a road accident in Mumbai | मुंबईत तीन वाहनांचा विचित्र अपघात, आठ जण जखमी
मुंबईत तीन वाहनांचा विचित्र अपघात, आठ जण जखमी

मुंबईः पहाटे तीन गाड्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या असून, या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. दृष्यमानता कमी असल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतल्या पश्चिम महामार्गावरील अंधेरीजवळ हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन कारचा चक्काचूर झाला आहे.  जवळपास आठवड्याभरानंतर मुंबईत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक भागात या पावसानं पाणी साचलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचारानंतर त्यांना सोडून दिलं आहे. 
 (सविस्तर वृत्त लवकरच)


Web Title: eight peoples were injured in a road accident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.