CoronaVirus News: अत्यावश्यक सेवांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न - पालिका आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 03:47 AM2020-05-28T03:47:24+5:302020-05-28T06:32:17+5:30

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले आहे

 Efforts to start Railways, Metro for essential services - Municipal Commissioner | CoronaVirus News: अत्यावश्यक सेवांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न - पालिका आयुक्त

CoronaVirus News: अत्यावश्यक सेवांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न - पालिका आयुक्त

Next

मुंबई : अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या, विरार, नालासोपारा, कल्याण, अंबरनाथवरून मुंबईत कामावर येणाºया कर्मचाऱ्यांचे दररोज चार ते सहा तास प्रवासातच जात आहेत. रेल्वे, मेट्रो सुरू झाल्यास त्यांचा वेळ वाचेल, यासाठी राज्य सरकारची केंद्राबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र वैद्यकीय कर्मचारी व अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाºया कर्मचाºयांना दररोज कामाच्या ठिकाणी हजर राहावे लागते. सध्या त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व बेस्ट उपक्रमाचा गाड्यांद्वारे प्रवास करावा लागत आहे. मात्र यामध्ये त्यांचा दररोज किमान चार ते सहा तास वेळ फुकट जात आहे. तसेच त्यांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.

वेळेसह आरोग्याची काळजी

लॉकडाउन खुले करण्याबाबत राज्य सरकार तत्कालीन स्थितीवरून निर्णय घेणार आहे. मात्र मुंबई बाहेरून येणाºया अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू झाल्यास त्यांचा वेळ वाचेल. पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रेल्वे सुरू करावी आणि केवळ पालिकेची सेवा असणाºया स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.

Web Title:  Efforts to start Railways, Metro for essential services - Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.