शिवसेना नेत्यांच्या अडचणी संपेनात; उद्धव ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराची ईडीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:54 AM2021-02-10T04:54:58+5:302021-02-10T08:02:57+5:30

आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीला पाचारण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले

ED interrogates Shiv Sena leader Anandrao Adsul for four hours | शिवसेना नेत्यांच्या अडचणी संपेनात; उद्धव ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराची ईडीकडून चौकशी

शिवसेना नेत्यांच्या अडचणी संपेनात; उद्धव ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराची ईडीकडून चौकशी

Next

मुंबई : माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सुमारे चार तास कसून चौकशी केली. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीला पाचारण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत एक हजार कोटीचा गैरव्यवहार झाला आहे, त्याला माजी खासदार आनंद आडसूळ व अन्य संचालक जबाबदार असल्याची  तक्रार केली आहे. याबाबत ईडी व अन्य केंद्रीय तपास यंत्रणांनी सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे, त्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी आडसूळ यांना ९  फेब्रुवारीला कार्यालयात हजर रहाण्यास नोटीस बजावली होती. त्यानुसार दुपारी तीनच्या सुमारास ते बेलार्ड पियर्ड येथील कार्यालयात पोहोचले. सायंकाळी सातपर्यंत त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

Read in English

Web Title: ED interrogates Shiv Sena leader Anandrao Adsul for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.