Join us  

वाळूशिल्पातून पर्यावरणपूरक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 4:51 AM

वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी जुहू चौपाटीवर १२ फूट वाळूची गणपती मूर्ती उभारून पर्यावरणपूरक संदेश दिला

मुंबई : गणेशोत्सवात अनेक कलाकार आपली कला सादर करत असतानाच जुहू कोळीवाडा येथे राहणाऱ्या वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी जुहू चौपाटीवर १२ फूट वाळूची गणपती मूर्ती उभारून पर्यावरणपूरक संदेश दिला आहे. हे वाळूशिल्प पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.मुंबापुरीत इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेशभक्तांचा कल दिसून येत आहे. गणेशभक्तांकडून प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापराऐवजी पर्यावरणपूरक वस्तूचा वापर करण्यात येत आहे. मात्र पूर्ण वर्षभर पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी मुंबईकरांनी सजग राहणे आवश्यक आहे. यासाठीच लक्ष्मी गौड यांनी ‘पर्यावरण बचाव’, ‘से नो टू प्लॅस्टिक’ असा संदेश वाळूशिल्पातून दिला आहे.वाळूची १२ फुटी गणेशमूर्ती आणि पर्यावरणपूरक संदेश लिहिण्यासाठी संपूर्ण एक दिवसाचा कालावधी लागला. यासाठी तब्बल १० टन वाळूचा वापर करण्यात आला आहे. नैसर्गिक नारंगी आणि हिरवा रंग वापरून वाळूशिल्पाला आकर्षित करण्यात आले आहे. १० वेळा रंगाचा थर वाळूवर दिल्याने शिल्प उठून दिसत आहे.१७ सप्टेंबर रोजी पुन्हा दुसरे वाळूशिल्प बनविण्यात येणार आहे. #मुंबईकर, #नो प्लॅस्टिक, #पर्यावरण बचावाचा संदेश वाळूशिल्पातून देण्यात येणार आहे, असे लक्ष्मी गौड यांनी सांगितले.

टॅग्स :गणेशोत्सव