Join us

ईस्टर्न स्ट्रीप्स....

By admin | Updated: September 2, 2014 23:04 IST

ईस्टर्न स्ट्रीप्स....

ईस्टर्न स्ट्रीप्स....

आशिया खंडातील सर्वात मोठा जलशुद्धिकरण प्रकल्प

भांडुपमध्ये आशिया खंडातील सर्वांत मोठा जलशुद्धिकरण प्रकल्प आहे. १९८० पासून भांडुप कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. २००७ मध्ये या प्रकल्पात काही इलेक्ट्रॉनिक सुधारणा करण्यासाठी ६० लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे प्रतिदिन २,१०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्धिकरण करण्याची या प्रकल्पाची मर्यादा आहे. शहरातील एकूण पाणी पुरवठ्याच्या ७० टक्के पाणी पुरवठ्यावर या प्रकल्पातून नियंत्रण ठेवण्यात येते. या प्रकल्पाला आयएसओ ९०००-२००१ प्रमाणपत्रही प्राप्त झालेले आहे.
.........................................
डॉ. चिंतामण द्वारकानाथ देशमुख उद्यान
मुलुंड पूर्वेकडील डॉ. चिंतामण द्वारकानाथ देशमुख उद्यान मुलुंडमधील सर्वांत जुने उद्यान म्हणून ओळखले जाते. मुलुंड पूर्वेला असलेल्या या उद्यानात मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. ११ जून १९८६ मध्ये हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. या उद्यानात सर्व वयोगटातील नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. या उद्यानात मुख्यत्वेकरुन ज्येष्ठ नागरिक आणि बच्चे कंपनीचा कल सर्वाधिक आहे. उद्यानातील घोड्यावरची रपेट हे विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होती. मात्र, कालांतराने घोडेस्वारी बंद करण्यात आली. हिरवळीने नटलेल्या या उद्यानात बच्चेकंपनीच्या खेळण्यापासून ज्येष्ठांसाठी जॉगिंग टॅ्रकची सुविधा करण्यात आली आहे.