Join us  

मुंबईतील प्रत्येक मोकळा भूखंड मौल्यवान; मलबार हिलमधील पार्कचे प्रवेशद्वार बंद केल्याचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:10 AM

मलबार हिल येथे लहान मुलांसाठी असलेले पार्क एका सोसायटीच्या पार्कला जोडून त्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. सोसायटीच्या या कृत्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयाने संताप व्यक्त करत म्हटले की, अशा प्रकारे सार्वजनिक जागा खासगी जागा म्हणून वापरता येणार नाही. मुंबईतील प्रत्येक भूखंड मौल्यवान आहे.

मुंबई : मलबार हिल येथे लहान मुलांसाठी असलेले पार्क एका सोसायटीच्या पार्कला जोडून त्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. सोसायटीच्या या कृत्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयाने संताप व्यक्त करत म्हटले की, अशा प्रकारे सार्वजनिक जागा खासगी जागा म्हणून वापरता येणार नाही. मुंबईतील प्रत्येक भूखंड मौल्यवान आहे.सार्वजनिक जागा अशा प्रकारे हडपता कशी येऊ शकते? मुंबई महापालिकेने हा १,०२१ चौ.मी. भूखंड सामान्यांना खुला करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, असे मुख्य न्या. मंजुळ चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने म्हटले.‘स्वत:च्या घरापुढे सुंदर बगिचा असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, त्यासाठी सार्वजनिक जागा हडपून ती खासगी जागा असल्याचा आव आणला जाऊ शकत नाही,’ असे न्यायालयाने संतापत म्हटले.मलबार हिल येथे मुलांसाठी असलेल्या पार्कची जागा हडपून एका बड्या सोसायटीच्या खासगी जागेशी जोडण्यात आली. त्यानंतर यावरजिम व तरणतलाव बांधत पार्कचेगेट बंद करण्यात आले. सार्वजनिक जागा व्यावसायिक हेतूकरिता वापरण्यात येत असल्याचा आरोप करीत येथील रहिवासी सुनील कोकाटे यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. आराखडा सादर करासंबंधित भूखंडाचा विकास करण्यासंदर्भात विकासकाने पालिकेशी करार केला होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित सार्वजनिक जागा सर्वांसाठी खुली असेल, असे करारात नमूद करण्याची तसदी पालिकेने घेतली नाही, असे संतापतच न्यायालयाने म्हटले. पालिका व सोसायटीला इमारतीचा मंजूर आराखडा मंगळवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

 

 

टॅग्स :मुंबई