Join us  

ई-कच-याचे संकट गडद! वेळेत नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 7:20 AM

- सागर नेवरेकर मुंबई : प्लॅस्टिक कच-यासोबत आता मुंबईकरांसमोर ई-कचºयाचे संकट उभे राहिले आहे. दैनंदिन वापरात वाढलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये हा धोका निर्माण झाला आहे. ई-कचºयाच्या पुनर्वापरापासून त्याची योग्य विल्हेवाट लागली नाही, तर मुंबईकरांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.दैनंदिन वापरातील टेलिव्हिजन, टेलिफोन, हेडफोन्स, मोबाइल, प्रिंटर, बॅटरी, चार्जर, संगणक, इलेक्ट्रॉनिक खेळणी अशी विविध विद्युत उपकरणे खराब झाल्यावर, त्यांचा ई-कचºयात समावेश होतो. बाजारात सतत नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू येत राहतात. कित्येक नागरिक इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्यावर, त्या नेहमीच्या कचºयात फेकून देतात. मात्र, तिथूनच खºया समस्येला सुरुवात होते. कारण सुका आणि ओल्या कचºयामध्ये ई-कचºयाचे विघटन होत नाही. ई-कचरा कमी करण्यासाठी संबंधितवस्तूंचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. नागरिकांकडील ई-कचºयाचेसंकलन करून, खासगी कंपन्यांकडून पुनर्चक्रांकनद्वारे (रिसायकलिंग) ई-कचºयाचे प्रमाण कमी होऊशकते.निकेल, बेरिअम, आर्सेनिक, लिथिअम, कॅडमिअम, पारा, शिसे, अँटिमनी असे अनेक धातू ई-कचºयात वापरले जातात. ओला आणि सुक्या कचºयासोबत मोबाइल किंवा कोणत्याही उपकरणातील बॅटरी डम्पिंग ग्राउंडवर जाणे अधिक धोकादायक आहे. त्यामुळे कचरा आरोग्यासाठी आणखी घातक होतो. त्यामुळे सुका आणि ओल्या कचºयाप्रमाणे नागरिकांनी ई-कचºयाचे वर्गीकरण करणे काळाची गरज आहे. सध्या काही कंपन्या ई-कचºयाचे संकलन करून, त्यातील विद्युत उपकरणे तोडून त्याचे भाग सुटे करतात. सुट्ट्या भागांवर अ‍ॅसिडचा वापर करून किंवा जाळून, त्यातले तांबे, अ‍ॅल्युमिनियम, चांदी इत्यादी धातू वेगळे करून पुनर्वापर करत आहेत....म्हणून ई-कचरा घातक!ई-कचºयाला आग लागल्यास, त्यातील डायआॅक्साइड, हायड्रोकार्बन यासारखे अनेक विषारी घटक हवेत पसरतात, तर घातक रसायने, आम्ले, धातू जमिनीत जातात, तसेच पाण्याच्या स्रोतापर्यंत पोहोचतात. त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होते. रासायनिक पदार्थ हवेतून, जमिनीतून आणि भूजलातून आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे मेंदू, मूत्रपिंडे, फुप्फुसे आणि त्वचा यावर दुष्परिणाम होतो.महत्त्व पटवूनदेण्याची गरज!मिथेन आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वातावरणात वाढल्याने, वातावरणात आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. शहरातला कचरा कमी करण्यासाठी, ई कचरा संकलन मोहीम गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था, उद्याने, धार्मिक ठिकाणे, कंपन्या अशा सर्व ठिकाणी राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी ई-कचºयाचे महत्त्व पटवून देण्याची गरज, इको-रॉक्स या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. हर्षा मेहता यांनी व्यक्त केली.इको-रॉक्सचा खारीचा वाटा!इको रॉक्स या पर्यावरण संस्थेकडून कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती केली जात आहे. ओल्या कचºयापासून खतनिर्मिती आणि ई-कचरा संकलन मोहीमही संस्था राबवित आहे. शैक्षणिक संस्थांचे ग्रीन आॅडिट करून, त्यांच्या अहवालात ऊर्जाबचत, पाणीबचत, कचरा व्यवस्थापन, यासारखे विविध प्रकारचे पर्यावरणस्नेही उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने कसे अंमलात आणावे, याचे मार्गदर्शन संस्था करत आहे, अशी माहिती इको-रॉक्सच्या संयुक्त सचिव रश्मी जोशी यांनी दिली.

टॅग्स :मुंबई