E-pass online: आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक; कसा काढायचा? जाणून घ्या प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:59 AM2021-04-24T05:59:42+5:302021-04-24T05:59:55+5:30

Check how to apply for e-pass here Maharashtra: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. अशात आता जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे

E-pass mandatory for inter-district travel; Check how to apply for e-pass online | E-pass online: आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक; कसा काढायचा? जाणून घ्या प्रोसेस...

E-pass online: आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक; कसा काढायचा? जाणून घ्या प्रोसेस...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. अशात आता जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. पोलीस विभागाने यासाठी संकेतस्थळाची लिंक दिली असून, त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलीस विभागाने केले आहे. (The Maharashtra government on Friday (April 23) reintroduced its e-pass system for interstate and inter-district travellers.)


अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशाप्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा अत्यावश्यक प्रवासासाठी ई-पास बंधनकारक आहे. यापूर्वीही लाॅकडाऊनवेळी  ई-पास बंधनकारक करण्यात आला होता. 

कसा काढायचा ई-पास?

  • ई-पास काढण्यासाठी तुम्ही https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा.
  • संकेतस्थळावर apply for pass here या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, त्यात विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्या.
  • यात कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे ते तुम्हाला निवडावे लागेल.
  • प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहात, याची माहिती द्या.
  • कागदपत्रांची माहिती एकत्रित करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी मिळेल. तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही? हे पाहण्यासाठी तसेच ई-पास काढण्यासाठी टोकन आयडी गरजेचा आहे. टोकन आयडी टाकून साईटवरून ई -पास डाऊनलोड करता येईल.
  • ई-पासवर तुमची वैयक्तिक माहिती, खासगी वाहनाने प्रवास करणार असल्यास त्याचा क्रमांक, पासची वैधता, क्यूआर कोड इत्यादी माहिती देणे गरजेचे आहे.

जवळच्या पोलीस ठाण्यातूनही मिळणार पास

जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊनही 
ई-पास घेता येईल, असेही महाराष्ट्र पोलिसांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन परिस्थितीतच वापर करण्याचे आवाहन
nमुंबई बाहेर जाण्यासाठी शासनाच्या नव्या नियमावलीनुसार ई-पास बंधनकारक असणार आहे. पासचा वापर केवळ आपत्कालिन परिस्थितीत केला जावा, असे आवाहन मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी केले आहे. 
nमुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी लागू केलेले कलर कोडिंग सिस्टम सुरुच राहणार असल्याचेही चैतन्या यांनी सांगितले.
 

Web Title: E-pass mandatory for inter-district travel; Check how to apply for e-pass online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.