Join us  

भविष्यात ई-कार होतील स्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 3:40 AM

येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीसाठी लागणाºया लिथियमला पर्याय शोधण्यात येत असून ते संशोधन यशस्वी झाले तर भविष्यात ई-कार स्वस्त होतील

मुंबई : येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीसाठी लागणाºया लिथियमला पर्याय शोधण्यात येत असून ते संशोधन यशस्वी झाले तर भविष्यात ई-कार स्वस्त होतील, असा विश्वास महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे एमडी व सीईओ डॉ. पवन गोएंका यांनी व्यक्त केला.‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स् २०१८’ या गुंतवणूकपरिषदेत झालेल्या ‘ई-वाहने व भविष्यातील ऊर्जाबचतीची साधने’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. गोएंका यांंनी २०३०पर्यंत १०० टक्के ई-वाहने कशी आणता येतील याचा रोडमॅप मांडला.जगातील ५० टक्के लिथियम हे दक्षिण अमेरिकेत असल्याचे सांगून डॉ. गोएंका म्हणाले, त्याची काळजी करण्याचे कारण नाही. बॅटरीसाठी लिथियमला पर्याय भविष्यात येऊ शकतो. त्यासाठीचे संशोधन सुरू आहे. यामुळेच पुढील पाच वर्षांत लिथियम बॅटरीची किंमत १०० डॉलर प्रति किलोव्हॅटने कमी होऊ शकेल. एका छोट्या इलेक्ट्रिक कारमध्ये साधारण १४ किलोव्हॅट तर मोठ्या कारमध्ये २३ किलोव्हॅट बॅटरी लागते. दुचाकीमध्ये साधारण ५ किलोव्हॅट बॅटरीची गरज असते. यानुसार, १०० डॉलरने बॅटरी स्वस्त झाल्यास छोटी मोटारही ८० हजारांनी स्वस्त होऊ शकेल.येत्या सहा महिन्यांतचार्जिंग स्टेशन्सदेशात इलेक्ट्रिक वाहने आणण्यातील प्रमुख समस्या चार्जिंग स्टेशन्सची आहे. मात्र येत्या सहा महिन्यांत मुंबई व पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्सचे जाळे उभे करण्याची घोषणा डॉ. गोएंका यांनी केली.