Join us  

भरतीदरम्यान मरिन ड्राइव्हवर जमा झाला ९ हजार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 6:12 AM

गेल्या आठवड्यात समुद्राला आलेल्या भरतीमुळे एकट्या मरिन ड्राइव्ह किनाऱ्यावर ९ हजार टन कचरा व डेब्रिज जमा झाल्याची माहिती एका एनजीओने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : गेल्या आठवड्यात समुद्राला आलेल्या भरतीमुळे एकट्या मरिन ड्राइव्ह किनाऱ्यावर ९ हजार टन कचरा व डेब्रिज जमा झाल्याची माहिती एका एनजीओने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.गेल्या आठवड्यात भरतीदरम्यान समुद्रातील सर्व कचरा व डेब्रिज मरिन ड्राइव्ह किनाºयावर जमा झाले. ९ हजार टन कचरा येथे जमा झाला. पालिकेच्या कर्मचाºयांनीच तो स्वच्छ केला, अशी माहिती ‘सिटीझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन’ या एनजीओचे वकील शहजाद नक्वी यांनी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर न्यायालयाने यास जबाबदार कोण, असा सवाल केला असता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी यास पालिका जबाबदार असल्याचे म्हटले. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पालिका ते समुद्रात सोडते. कचराही किनाºयाजवळच टाकते. त्यामुळे ही स्थिती ओढावली, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. हे मुद्दे गंभीर असल्याचे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणी ३० जुलै रोजी ठेवली.