Join us  

भरदिवसा महिलेवर घरात घुसून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : काल्हेर येथे शिवसेना शाखाप्रमुखावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी भरदिवसा घरात घुसून महिलेवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : काल्हेर येथे शिवसेना शाखाप्रमुखावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी भरदिवसा घरात घुसून महिलेवर गोळीबार झाल्याची घटना एका सोसायटीमध्ये घडली.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयश्री देढे (३७) असे जखमी महिलेचे नाव असून काल्हेरमधील जय दुर्गा सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहतात. महिलेच्या पतीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्याही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सांभाळतात. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पती कामानिमित्त तर मुलगा मित्रांकडे गेले असता जयश्री घरात एकट्याच होत्या. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती रिक्षातून आल्या व त्यांनी घरात घुसून जयश्री यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

या वादातून त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल्हेरमधील गोळीबाराची ही दुसरी घटना असून घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या गोळीबारामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.